साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर
पाळधी बु. येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी तिरंगी लढत होणार आहे. ११ जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. १७ पैकी सहा जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.
पाळधी बु. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी ९ अर्ज दाखल झाले होते. मात्र, माघारीच्या दिवशी सहा जणांनी माघार घेतल्याने आता या पदासाठी तीन जण रिंगणात आहे. त्यामुळे तिरंगी लढत होणार आहे. सात वॉर्डातून १७ जागांसाठी ६६ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यातून सहा जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित ११ जागांसाठी २७ उमेदवार निवडून रिंगणात उतरले आहेत. बिनविरोध निवडून आलेल्या जागांमध्ये वॉर्ड एकमधून २, वॉर्ड दोनमधून ३ तर वॉर्ड तीनमधून १ अश्ाा ६ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यात सर्वाधिक वॉर्ड चारमधून ३ जागांसाठी १० उमेदवार रिंगणात उतरले आहेत.