साडेतीन वर्षीय बालिकेचा विनयभंग : आरोपीला अटक

0
32

साईमत/ न्यूज नेटवर्क/भुसावळ :

शहरात एका गावातील रहिवासी साडेतीन वर्षीय मुलीचा शाळेच्या व्हॅन चालकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला नवीन भारतीय न्याय संहिता कायद्यानुसार विनयभंग व पोक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे भुसावळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.

ही मुलगी सोमवार आणि मंगळवारी, २ जुलै रोजी शाळेत जात असताना व्हॅन चालक संशयित प्रसाद हिरासिंग चौधरी यांनी साडेतीन वर्षीय मुलीच्या गुप्तांगाची छेडछाड करून दुखापत करीत विनयभंग केला. हा प्रकार बालिकेने गुरुवारी आईला सांगितल्यानंतर याप्रकरणी बालिकेच्या आईच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला विनयभंग व पोक्सो अंतर्गत कलम अनुसूचित जाती अत्याचार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तपास भुसावळ पोलीस उपविभागीय अधिकारी कृष्णकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठचे सपोनि गजानन पडघम करीत आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here