Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»शिरसोलीच्या अल्पवयीन मुलीस पळवणाऱ्यांना अटक
    क्राईम

    शिरसोलीच्या अल्पवयीन मुलीस पळवणाऱ्यांना अटक

    SaimatBy SaimatAugust 9, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, प्रतिनिधी, जळगाव, 

    तालुक्यातील शिरसोली येथील एका 16  वर्षीय अल्पवयीन मुलीस सुरत येथे पळवून घेवून जाणाऱ्या व त्यास मदत करणाऱ्या अशा दोघांंना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडित मुलीला पोलिसांनी पालकांच्या स्वाधिन दिले आहे .

    याबाबत माहिती अशी क ी,  सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेदरम्यान शिरसोलीतील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी  बेपत्ता झाली होती. मात्र तिचा शोध घेऊनही ती आढळून न आल्याने सेंट्रिंग व हातमजुरीचे काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या पित्याने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यावरून  भादंवि कलम 363 प्रमाणे दिनांक 25 जुलै रोजी  गुन्हा दाखल झाला होता. सदरचा गुन्हा पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक, अमोल मोरे, पोहेकॉ रतिलाल पवार हे करीत असतांना त्यांना आरोपी आणि पीडित मुलगी हे सुरत येथे असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून पथकातील पो. कॉ. अर्चना गायकवाड यांचे पथकाने सुरत येथे जावून सदर गुन्ह्यातील आरोपी विकास दौलत बारी व अल्पवयीन पीडिता यांचा शोध घेवून  8 ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले. पीडित व आरोपींना विचारपुस केली असता त्यांना खोली भाड्याने घेवून देणारा व त्यांना मदत करणारा सागर अनिल बारी ( वय 29)  रा.लक्ष्मणनगर, नवागाव,दिडोली, सुरत  यास ताब्यात घेतले आहे.

    याप्रकरणी पीडित मुलीचा जबाब नोंदविला असता  अल्पवयीन पीडित व आरोपी विकास दौलत बारी ( वय 25 ) वर्ष यांना शिरसोली येथून पळवून जाण्यास त्याची मोटारसायकलवर बसवून पाचोरा येथे सोडणारा गणेश अशोक अस्वार ( वय 22) रा.शिरसोली प्र.बो. ता.जि.जळगांव असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्ह्यात भादंवि कलम 376, 212 सह पोक्सो कायदा कलम 4 व 17 वाढीव कलम लावण्यात आले आहे. सदर आरोपीस देखील गुन्ह्यात सहायक केल्याने त्याची मोटारसायकल जप्त करण्यात आली व त्याला सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.

    हल्ली अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याबाबत गुन्हा दाखल झाल्यावर अशा पीडितेस पळवून नेण्यासाठी आरोपींनी अनेक मुलांनी सहाय्य केल्याचे समोर येत आहे. अशा गुन्ह्यात मदत करणे व आश्रय देणे हा दखलपात्र गुन्हा आहे. याची नागरिकांना माहिती व्हावी व यापुढे कोणी अशा गुन्ह्यात मदत करू नये, असे आवाहन एमआयडीसी पोलिसांकडून करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Varangaon : वरणगाव पोलिसांची धडक कारवाई; गावठी पिस्तूलसह आरोपी ताब्यात

    March 15, 2026

    Amalner : अमळनेर हादरले! भरधाव डंपरने तरुणाला चिरले जागीच मृत्यू

    March 15, 2026

    Bhusawal : भुसावळ तलाठी कार्यालयाचे ४२,५६० रुपयांचे वीज बिल थकीत

    March 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.