मोहाडी गावातून तरुणाची दुचाकी चोरट्यांनी लांबविली

0
32

साईमत जळगाव प्रतिनिधी

तालुक्यातील मोहाडी गावातील एका तरुणाची हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भा मंगळवारी रात्री ८ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेतन संजय सोनवणे (वय-२७) रा. मोहाडी (ता.जळगाव) याने १९ मे रात्री १० ते २० मे सकाळी ६ वाजेच्या सुमारास त्याची दुचाकी घरासमोर लावलेली असताना अज्ञात चोरट्याने चोरून नेली. त्यानंतर त्याने परिसरात दुचाकीचा शोध घेतला. परंतु दुचाकी कुठेही मिळून आले नाही. अखेर मंगळवारी रात्री ८ वाजता तरुणाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर पाटील करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here