साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर
येथील कोळी वाड्यातून चोरट्यांनी रात्री ट्रॅक्टर लंपास केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर मालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे.
येथील कोळी वाड्यातील रहिवासी अनिल शालिक सपकाळे यांनी घराबाहेर लावलेले निळ्या रंगाचे ट्रॅक्टर (क्र. एमएच २० एवाय ७०२७) स्वराज ७३५ कंपनीचे ट्रॅक्टर अंदाजे किंमत एक लाख पन्नास हजार रुपयांचे चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना त्यांना सकाळी कळताच त्यांनी सगळीकडे ट्रॅक्टरचा शोध घेतला. मात्र, ते मिळून आले नाही. त्यामुळे त्यांनी पाळधी पोलिसात धाव घेऊन घटनेची माहिती दिली. त्यांनीही शोध घेतला. मात्र, ते मिळून आले नाही. पुढील तपास स.पो.नि. सचिन शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल पाटील करीत आहेत.