साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी
यावल नगरपालिकेत गेल्या वर्षभरापासून प्रभारी कारभार सुरू असल्याने लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासनाचा प्रभाव नसल्याने यावल नगरपालिकेतील सर्व कारभार संबंधित ठेकेदार, कर्मचारी,विकासक,मध्यस्थी दलाल आपल्या सोयीनुसार करून घेत असल्याने यावल नगरपालिकेच्या कारभारावर आणि नागरिकांच्या विविध अडीअडचणी संदर्भात मोठा विपरीत परिणाम झाला आहे.
नगरपरिषद मालकीच्या व्यापारी संकुलनातील गाळाधारकांना नोटीसा देऊन सुद्धा संबंधित गाळे धारक आपला गाळा यावल नगर परिषदेला रिकामा करून देत नाही, नागरिकांनी केलेल्या तक्रारीवर कोणतीही कारवाई होत नाही ही वस्तुस्थिती आहे,त्याचप्रमाणे ओला व सुका कचरा वाहतूक करून विलगीकरण व त्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या ठेक्यात मोठा गैरप्रकार,भ्रष्टाचार दैनंदिन रित्या सर्रासपणे सुरू आहे.
यावल शहरातील दैनंदिन साफसफाई,पाणीपुरवठा अनियमित होत आहे,यावल नगर परिषद हद्दीत विविध बांधकामे करताना यावल नगरपालिकेचे सर्व अटी शर्ती नियम खड्ड्यात घालून सर्रासपणे बेकायदा बांधकामे सुरू आहेत,विकासकांनी तर रहिवास प्रयोजनार्थ परवानगी मिळविताना सर्व अटी शर्ती खड्ड्यात घालून रहिवास प्रयोजनार्थ जागांवर नियमानुसार आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून न देता बेकायदा प्लॉट विक्री केली आहे.
यावल भुसावल रोडवर यावल शहराच्या दर्शनी भागावरच विकास कॉलनीतील संपूर्ण वापराचे घाण पाणी सार्वजनिक वापराच्या रस्त्यावर म्हणजे भुसावल रोडवर येत असल्याने रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. याकडे सुद्धा यावल नगरपालिकेचे शंभर टक्के दुर्लक्ष होत आहे. यावल नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराकडे लोकप्रतिनिधी आपले लक्ष केंद्रित का करत नाही प्रश्न उपस्थित होत असून यावल नगरपालिकेवर कोणाचाही प्रभाव राहिलेला नाही असे बोलले जात आहे यामुळे जिल्हाधिकारी जळगाव यांनी यावल नगरपालिकेच्या कारभाराकडे लक्ष केंद्रित करून कारवाई करावी अशी मागणी संपूर्ण यावल शहरातून होत आहे.