जळगाव : पारोळा तालुक्यातील सावरखेडा येथील शेतकरी चार दिवस बाहेरगावी गेलेले असताना अज्ञात चोरांनी घराचे कुलूप तोडून घरातील एक लाख ५३ हजार पाचशे रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन पसार झाले. पारोळा तालुक्यातील सावरखेडा येथील भालेराव शंकर पाटील हे शेतकरी असून १४ जानेवारी ते १७ जानेवारी या कालावधीत घराला कुलूप लावून ते बाहेर गेले होते. अज्ञात चोरटे या संधीचा फायदा घेऊन घरातील सोन्याचे मंगळ पोत, सोन्याची अंगठी, चांदीचे कडे व ६० हजार रुपये रोख असा एकूण एक लाख ५३ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले. या प्रकरणी पारोळा परिसरात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे करीत आहे.