साईमत जळगाव प्रतिनिधी
आपल्याला थिएटर विचार देते, दृष्टी देते आणि आपले व्हिजन तयार करते, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय थिएटर दिग्दर्शक आणि थिएटर ऑफ रेलेवंसचे डायरेक्टर मंजूल भारद्वाज यांनी केले. ते खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत बोलत होते.
या कार्यशाळेत “रंगमंच मानवमुक्ती आणि राष्ट्र उभारणीसाठी कला” या विषयावर भारद्वाज यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. व्यासपीठावर “लोकशास्त्र सावित्री” या नाटकाच्या कलाकार अश्विनी नांदेडकर, कोमल खामकर आणि सायली पावसकर उपस्थित होत्या. प्रा.अनिलकुमार मार्थी यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
भारव्दाज विद्यार्थ्यांशी बोलताना पुढे म्हणाले की, तुमच्या आयुष्यातुन कॉम्पिटिशनचे भूत आधी बाहेर काढून टाका. शिव आणि कलाकार यांचा संबध समजावून सांगतांना ते म्हणतात की, कोणतीही कला म्हणजेच “आर्ट”, ART म्हणजे आर्ट आँफ रोमान्स अँन्ड ट्रूथ, हे समजून घ्या. भगवान शिव यांच्या फोटोत तुम्ही बघतात की, शिव हा नागाला बरोबर घेऊन फिरतात. म्हणजे काय तर आपल्या आव्हानांना “वेलकम” करतात. गणपतीचे वाहन उंदीर आहे. आता सापाला उंदीर हवा असतो. शिवाचा दुसरा मुलगा कार्तिकेय आहे. त्यांचे वाहन मोर आहे
आणि मोराला साप हवा असतो. शेतात हे सर्वच असतात. हेच जीवनाचे संतुलन आहे. कारण शिव हे सर्व कलांचे आराध्य दैवत आहे. शिवांचा तिसरा डोळा म्हणजे काय? हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले. आमचा देश हा धार्मिक नाही, तर आध्यात्मिक आहे, हे कायम लक्षात असू द्या.भारत हा जगाला विचार प्रदान करणारा देश आहे, असेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन यामिनी भाटिया यांनी केले. याप्रसंगी डॉ.शमा सराफ, पुनित शर्मा, जयश्री महाजन, कविता पवार आदी उपस्थित होते.