तरुणाने दवाखान्यातील उपचार थांबवून थेट मतदान केंद्रात जाऊन केले मतदान

0
78

समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी आजारपणातही मतदान करुन मतदानाचा हक्क बजावला

साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील जामनेर विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी, २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. सकाळपासून जामनेर मतदार संघातील प्रत्येक गावातील नागरिकांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. अशातच ‘माणुसकी ग्रुपचे’ जळगाव जिल्हाध्यक्ष तथा समाजसेवक गजानन क्षीरसागर हे आजारपणामुळे आपल्या मुलीसोबत जामनेरातील खासगी दवाखान्यात ॲडमिट होते. त्यांनी चक्क मतदान करण्यासाठी जामनेर येथील डॉक्टरांना विनंती करून त्यांना लावलेली सलाईन थांबवून थेट पाळधी येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर पोहोचले. त्यानंतर त्यांनी आपला मतदानाचा राष्ट्रीय हक्क बजावला. त्यामुळे निश्चित अशा तरुणाचा उत्साह पाहून इतर मतदारांनीही जास्तीत जास्त प्रमाणात मतदानासाठी मतदान करुन त्यांनी राष्ट्रीय हक्क बजावला आहे. वयोवृद्ध दाम्पत्य, तरूण मंडळी, महिला यांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन देशाच्या लोकशाहीला बळकट केले.

ताप, अशक्तपणा तसेच त्यांची मुलगी स्वरा क्षीरसागर ही ॲडमिट असूनही हॉस्पिटलमधून थेट निवडणूक केंद्रावर येत मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने भविष्यातील निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे, असे समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here