अपघातातील जखमी झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू

0
34

साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर

येथील अमोल रामदास साठे हा बावीस वर्षीय तरुण मोटरसायकलने कामानिमित्त जात असताना भडगावजवळ गेल्या नऊ दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला होता. जखमी झालेल्या तरुणाला पाचोरा येथे दवाखान्यात दाखल केले होते. मात्र, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी त्याला जळगाव येथे गोदावरी हॉस्पिटल येथे दाखल केले होते. तब्बल नऊ दिवस डॉक्टरांनी तरुणाला वाचविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. मात्र, नीतीला ते मान्य नव्हते. अखेर शुक्रवारी,१७ नोव्हेंबर रोजी दुपारी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयत अमोल साठे यांच्या पक्षात आई-वडील, दोन भाऊ, आजी, काका, काकू असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here