कजगाव येथील रेल्वे क्रॉसिंग उडान पुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे

0
6

साईमत लाईव्ह कजगाव प्रतीनिधी

कजगाव ता भडगाव येथील नवीनच तयार करण्यात आलेला पारोळा कजगाव रस्त्यावरील रेल्वे क्रॉसिंग उड्डाण पुलावर पडलेल्या मोठमोठ्या खड्यांमुळे अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे.

श्री चक्रधर स्वामी कजगाव गोंडगाव रेल्वे क्रॉसिंग उड्डाण पूल नव्यानेच बनवण्यात आला आहे. मात्र ह्या पुलाच्या लोकार्पणाला चार महिने उलटत नाहीत तोच खराब झालेल्या कामामुळे पुलाचे मात्र बारा वाजल्याचे दिसून येत आहे. पुलाच्या अगदी मधोमध भागावर मोठमोठी खड्डे पडली आहेत, व अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्यातील दगडे(खडी) मोठ्या प्रमाणावर दिसून येतात तर अनेक ठिकाणी मोकळे पडलेले खड्डे अपघातास कारणीभूत ठरत आहेत, यापूर्वी ह्या पुलाला अनेक ठिकाणी मोठमोठी खड्डे पडली होती मात्र त्यावर तात्पुरती मलमपट्टी करून खड्डे बुजवण्यात आले, मात्र ठोस उपाय न केल्याने अजून त्यावर खड्डे पडले आहेत ह्या खड्यात वेगाने येणाऱ्या गाड्या विशेष मोटारसायकल आदळता व प्रसंगी तोल जाऊन त्या घसरण्याच्या घटनेत ही वाढ झाली आहे.

त्यामुळे ह्या नवीनच तयार करण्यात आलेल्या पुलाच्या निकृष्ठते तब्बल प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. ह्या बाबीकडे संबधीतांनी गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे चक्रधर स्वामी रेल्वे क्रॉसिंग उड्डाण पुलावर पडलेले खड्डे त्वरित कायमस्वरूपी बुजवावे अशी मागणी जोरदार होत आहे.

“”””:पुलाच्या नामकरण फलकाचा विसर

दरम्यान मोठ्या वाजत गाजत कजगाव पारोळा रस्त्यावरील रेल्वे क्रॉसिंग उड्डाण पुलाचे लोकार्पण करून मोठ्यांउत्साहात ह्या पुलाचे नामकरण श्री चक्रधर स्वामी रेल्वे क्रॉसिंग कजगाव गोंडगाव रेल्वे उड्डाण पूल असे करण्यात आलेले आहे. मात्र नामकरणाची घोषणा होऊन तब्बक तीन महिने पेक्षा अधिकचा कालावधी लोटला गेला आहे मात्र अजूनही विविध क्षेत्रातुन मागणी होऊनही ह्या पुलाला नामकरण फलक लावण्यात आलेला नाही त्यामुळे कजगाव सह परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here