साईमत जळगाव प्रतिनिधी
अयोध्येपासून देशाच्या कानाकोपऱ्यात राम धुन ऐकू येत आहे. करोडो सनातनी भक्त रामलल्लाच्या भक्तीत रंगलेले दिसतात. ‘राम’ शब्द शक्तिशाली आहे आणि रामायण म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. व्यास गादीवरून रामभक्तांना संबोधित करताना ह.भ.प. दादा महाराज जोशी म्हणाले.
अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिष्ठापनेचे औचित्य साधून, जळगाव शहरातील जी. एस. ग्राउंड येथे शनिवार दि. २० जानेवारी पासून ४ दिवशीय भव्य श्रीराम कथा आयोजित करण्यात आली. या कथेचे निरुपण कथाकार ह.भ.प. परमपूज्य दादा महाराज जोशी ‘श्रीराम कथा’ सादर करत आहे. दरम्यान, कथेच्या सुरुवातीला प्रस्तावना, रामायण परिचय, रामायणाचा व सदय जीवनान समन्वय, प्रभु राम यांचा परिचय आणि गंगा अवतरण होईल, असे कथेच्या पहिल्या दिवसाची रूपरेषा आहे.
या भव्य श्रीराम कथेसाठी ३२ फुट बाय ६० फुटांचे भव्य मंच तसेच १० हजार भाविकांसाठी बैठक तर वयोवृद्ध गटासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी बालअवस्थेतील असलेले श्री रामलल्ला ते राज्यभिषेक प्रभु श्रीरामांचे देखावे सादर होणार आहेत. या ४ दिवशीय रामोत्सवात दुपारी १ ते पावणे २ वाजेपर्यंत उत्कृष्ट कलावंतांचे सादरीकरण होणार आहे. दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कथावाचक परमपूज्य दादा महाराज जोशी यांच्या मधुर स्वरात श्रीराम कथा सादर होईल. यानंतर सांयकाळी ५:३० ते ६ यावेळेत ‘श्री रामरक्षा स्तोत्र’ स्पर्धा शालेय स्तरावर घेण्यात येणार आहे. कथेदरम्यान दररोज पाण्याची व प्रसादाची नियमित व्यवस्था असणार आहे. तसेच भव्य पार्किंग व ‘नमो अॅप’ डाउनलोडची स्वतंत्र व्यवस्था याठिकाणी करण्यात आली आहे. अशी माहिती आ. राजूमामा भोळे मित्र परिवारातर्फे देण्यात आली आहे.
आजपासून अयोध्येतील बहुप्रतिक्षित प्रभु श्री राम यांच्या जीवनावर आधारित कथेला प्रारंभ झाला आहे. नागरिकांना राम मंदिराची मोठी ओढ निर्माण झाल्यामुळे सर्वत्र हर्ष आणि उत्साहाचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान, दीपकराव घाणेकर, विश्वास कुलकर्णी, संजय भावसार, संजय मराठे, तुकाराम बुडा आणि अनिल सोनवणे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. तर कथा समाप्तीवेळी आरती पूर्वी वयोवृध्द सुलोचना विखे (९४ वय), आ. राजूमामा भोळे, माजी महापौर सीमा भोळे आदींनी आरती केली. कथेचे संचालन सरिता खाचणे यांनी केले.
श्रीराम कथा समिती आयोजक
प्रमुख रामभक्त ना. गिरीषभाऊ महाजन, आ. राजूमामा भोळे, नितीन लढ्ढा, राजू बांगर, अशोक जाजू, देवेंद्र अग्रवाल, अशोक राठी, श्याम जोशी, संजय व्यास, यशवंत बारी, नितीन पाटील, मनीष बाहेनी, श्रीनिवास व्यास, रामदयाल सोनी, पवन अग्रवाल, सुरेंद्र अग्रवाल, विशाल भोळे आणि शिवमहापुराण सेवा समिती व आ. राजूमामा भोळे मित्रपरिवारातर्फे आयोजन करण्यात आले आहे.
