जामनेरातील इंदिराबाई ललवाणी विद्यालयाच्या व्हॉलीबॉल संघाची विभागीय स्तरावर धडक

0
26

विजयी खेळाडूंना किशोर महाजन यांच्या हस्ते मोफत किटचे वाटप

साईमत/जामनेर/प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व श्री मुरलीधरजी मानसिंगगका साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. त्यात इंदिराबाई ललवाणी माध्य. व उच्च माध्य.विद्यालय १९ वर्षाआतील मुलींचा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी झाला. या संघाने विभागीय स्तरीय व्हॉलीबॉल अजिंक्य क्रीडा स्पर्धेत धडक मारली.

अंतिम सामना इंदिराबाई ललवाणी विद्यालयविरुद्ध डी.डी.एस.जी विद्यालय, चोपडा प्रथम सेट १५-०८ तर द्वितीय सेट १५-१३ ने पराभव करून संघाने विजयी घोडदौड कायम ठेवली. जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत एकूण सहा संघांनी सहभाग घेतला होता. सर्व विजयी खेळाडूंना इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे सचिव किशोर महाजन यांच्या हस्ते मोफत किट (टी-शर्ट, शॉर्ट पॅन्ट) देऊन पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी मुख्याध्यापक एस.आर.चव्हाण, उपप्राचार्य प्रा.के.एन.मराठे, माध्यमिक विभागाचे क्रीडा शिक्षक बी.पी.बेनाडे, गजानन कचरे, उच्च माध्यमिक विभागाचे क्रीडा शिक्षक प्रा.समीर घोडेस्वार आदी मान्यवर उपस्थित होते.

विजयी खेळांडूमध्ये यांचा आहे समावेश

नाशिक विभागीय स्पर्धेसाठी ९ ऑक्टोबर रोजी संघ खेळणार आहे. विजयी संघातील खेळांडूमध्ये कप्तान सुजाता प्रमोद माळी (१२ वी कला), अंजली गजानन पंडीत (१२ वी कला), दिव्याभारती निवृत्ती माळी(१२ वी वाणिज्य), नेहा सुनिल देशमुख (१२ वी विज्ञान ), साक्षी अशोक माळी (१२ वी विज्ञान), संचिता भगवान पाटील (११वी कला), खुशी आनंद लोखंडे (११ वी विज्ञान), हर्षाली प्रमोद माळी (९ वी), आरती पुंडलिक वाघ (८वी), श्रद्धा शैलेंद्र भागवत (८वी) यांचा समावेश आहे. विजयी संघाला क्रीडा विभाग प्रमुख जी.सी.पाटील, प्रा.समीर घोडेस्वार यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here