Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भोलाणे येथील ग्रामस्थांनी दिलेल्या प्रेमापोटी कामातून उतराई होणार !
    जळगाव

    भोलाणे येथील ग्रामस्थांनी दिलेल्या प्रेमापोटी कामातून उतराई होणार !

    SaimatBy SaimatAugust 9, 2023No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, प्रतिनिधी, जळगाव

    रुग्ण सेवेत रुग्णवाहिकेचे अनन्य साधारण महत्त्व असून, स्व. अमोल अण्णाभाऊ कोळी यांच्या स्मरणार्थ अण्णाभाऊ विठ्ठल कोळी यांनी दिलेल्या रुग्ण्वाहिकेमुळे गरजू रुग्णांना जलद उपचार मिळण्यास मदत होणार आहे. भोलाणे व परिसरातील नागरिकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिले आहे. महर्षी वाल्मिक सभागृहासाठी व वाचनालयासाठी निधी मंजूर करणार असल्याचे सांगत भोलाणे व परिसर ग्रामस्थांनी दिलेल्या प्रेमापोटी कामातून उतराई होणार असल्याचे भावनोद्गार पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काढले. ते भोलाणे येथे रुग्णवाहिका लोकार्पण व विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील होते.

    या कामांचे झाले लोकार्पण व भूमिपूजन

    सुरुवातीला ढोल -ताश्ाांच्या गजरात पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा प्रमुख निलेश पाटील व मान्यवरांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर  ग्रामपंचायत, वि. का. सोसायटी , भजनी मंडळ व ग्रामस्थांमार्फत ना.गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी काही महिन्यांपूर्वी स्व. अमोल कोळी यांचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांनी अण्णा विठ्ठल कोळी व भरत येवस्कर यांनी गाव व परिसरासाठी रुग्ण्वाहिका देण्याचा निर्णय घेतला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सदर रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच गावांतर्गत 20 लाखांच्या रस्ता काँक्रिटीकरण व आमदार निधीतील 3 लाखांच्या चौक काँक्रिटीकरण कामाचे विधिवत पूजा करून ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

    भोलाणे व परिसरातील रस्त्यांसाठी 15 कोटींचा निधी मंजूर !
    भोलाणे असोदा रस्ता 7 कोटी, भोलाणे ते भादली रस्ता व भादली ते नशीराबाद रस्त्याचे डांबरीकरण 5 कोटी , भोलाणे ते सुजदे रस्ता सुधारणा करणे 50 लक्ष, भोलाणे ते सुजदे रस्ता डांबरीकरण व कॉक्रिट करणे 50 लक्ष, भोलाणे गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना  40 लक्ष, गावांतील प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम 1 कोटी 50 लक्ष, गावात सभागृह बांधकाम, रस्ते काँक्रिट, पेव्हिंग ब्लॉक बसवणे, 25/15 मूलभूत सुविधेंतर्गत, आमदार निधीतून आणि गौणखनीज व इतर योजनेतुन सुमारे 80 लक्ष असे एकूण 15 कोटी 70 लाखांचा निधी मंजूर आहे. तर काही कामे प्रगतीत तर काही कामांना लवकरच वर्क ऑर्डर देण्यात येणार आहे. या विविध विकास कामांमुळे शेतकरी, ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.

    यांची होती उपस्थिती
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नामदेव सपकाळे यांनी केले. आभार अजय कोळी यांनी मानले. याप्रसंगी जिल्हा जिल्हाप्रमुख निलेश पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते भरत येवस्कर, तुषार महाजन, भादली सरपंच मिलिंद चौधरी, भोलाणे सरपंच नितीन कोळी, उपसरपंच देविदास कोळी , माजी सरपंच नानाभाऊ सोनवणे, भीमराव सपकाळे, अजय कोळी, रामकृष्ण कोळी, सोमनाथ कोळी, नागो कोळी, समाधान कोळी, ग्रा .पं.सदस्या सुरेखा कोळी, शोभाताई कोळी, लताबाई कोळी, किशोर चौधरी, संदीप कोळी, सलीम पिंजारी, भूषण पाटील, प्रकाश सपकाळे, दिनेश नारखेडे, युवराज सपकाळे, कडू कोळी, हर्षल नारखेडे, वासुदेव कोळी, भीमराव सपकाळे, रामदास सपकाळे यांच्यासह भोलाणे – भादली परिसरातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव तालुक्यात दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक

    March 25, 2026

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026

    Jalgaon : कर न वाढवता विकासाचा मार्ग जळगाव मनपाचा अर्थसंकल्प मंजूर

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.