सोयगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील जरंडी ग्रामपंचायतीच्यावतीने ‘माझी वसुंधरा’ उपक्रमाअंतर्गत प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यासह सोयगाव तालुक्यातील प्लास्टिक पिशवी बंदीचा निर्णय व निर्धार करणारे जरंडी गाव अग्रस्थानी ठरणार आहे.
गावातील व्यावसायिक, किराणा दुकानदार, ग्रामस्थांनी प्लास्टिक पिशवीचा वापर बंद करून कागदी पेपर पिशवीचा वापर करून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतमार्फत केले आहे. दररोज वापरता प्लास्टिक पिशवीचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येऊन प्लास्टिक पिशव्या रस्त्यावर, मोकळ्या पटांगणात उकिरड्यावर फेकल्या जातात. गुरा-ढोरांच्या खाण्यात प्लास्टिक पिशव्या येत असल्याने त्यांच्या जीवितास हानी होण्याची शक्यात असते. तसेच प्लास्टिक पिशवीचा अति वापर व वापर झाल्यानंतर त्यांची विल्हेवाट लावून तिला योग्य प्रकारे नष्ट करता येत नसल्याने त्याची काळजी म्हणून जरंडी ग्रामपंचायतने प्लास्टिक पिशवी बंदीचा निर्धार केलेला आहे.
प्लास्टिक बंदीविषयी ग्रामस्थांना यांचे आवाहन
प्लास्टिक बंदीविषयी जरंडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे, सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच संजय पाटील, सदस्य वंदना पाटील, नीलिमा पवार, सलमाबाई तडवी, लिलाबाई निकम, मधुकर पाटील, मधुकर सोनवणे यांच्यासह इतर ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी संतोषकुमार पाटील, सोयगाव येथील प्रमोद स्टीलचे प्रमोद रावणे, दिलीप पाटील, सतीश बावस्क, अनिल शिंदे ग्रामस्थांना आवाहन करत आहे.