कळंबातील दिंडी सोहळ्याप्रसंगी विठुरायाबाबत काढले गौरवोद्गार
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
पंढरीचा पांडुरंग म्हणजे अविट गोळीचा भक्ती रस आहे. अशा भक्तीरसाचा स्वाद ज्ञानोबा, तुकाराम यांनी तर घेतलाच. पण त्यानंतर ७५० वर्षांपूर्वी वारकऱ्यांनी भक्तीरसात उडी घेतली होती. त्यामुळे मनुष्य देहाचे सार्थक ‘विठरायाच्या’ भक्तीरसात असल्याचे गौरवोद्गार रुक्मिणी माता मंदिराच्या पुजारी उर्मिला भाटे यांनी विठुरायाबाबत काढले. पंढरपूर शहरातील कळंब येथे गुरु शंकर भारती महाराज यांच्या दिंडी सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
महाराष्ट्र धर्म मराठी माणसांमुळे वाढीस लागला आहे. ज्ञानोबा, तुकारामांचे अभंग थोर कवी, लेखक, साहित्यिकांनी त्यात भर घातली आहे. ज्ञानेश्वरी, हरिपाठ, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी अशा साहित्यामुळे वारकरी परंपरा समृद्ध झाली आहे. सामान्य वारकऱ्याला, शेतकऱ्याला हा भगवंत सतत सहाय्य करीत असतो, असेही त्या म्हणाल्या.
गुरु शंकर भारती मठातर्फे हस्तलिखिताची प्रत दिली भेट
यावेळी गुरु शंकर भारती मठाच्यावतीने हस्तलिखिताची एक प्रत उर्मिला पाटील यांना भेट म्हणून देण्यात आली. याठिकाणी येता आले. त्यामुळे अनेक भाविकांची ऋणी राहील, अशा शब्दातही उर्मिला ताईंनी प्रवचनातून विठ्ठल रुक्माईच्या अनेक लीलांचे वर्णन केले. यावेळी मंदिर समितीचे पदाधिकारी, समता नगरातील रहिवासी, कळंब भागातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.