उमेदवारी मिळो ना मिळो विधानसभा वाघ परिवार लढणारच : संजय वाघ

0
103
filter: 0; jpegRotation: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; module:1facing:0; hw-remosaic: 0; touch: (-1.0, -1.0); modeInfo: ; sceneMode: Night; cct_value: 0; AI_Scene: (-1, -1); aec_lux: 3.0; hist255: 0.0; hist252~255: 0.0; hist0~15: 0.0;

मतदार संघात शरद पवारांनी उमेदवारी द्यावी, आढावा बैठकीत कार्यकर्त्यांचा दृढ निर्धार

साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :

राज्यात शरदचंद्र पवार यांना प्रचंड सहानुभुती असल्याने जिल्ह्यात पक्ष संघटन आणि ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी आगामी काळात सज्ज रहावे. गेल्या दहा वर्षांपासून पक्षाचे पदाधिकारी सत्ता आणि आमदारकीपासून दूर आहेत. मतदार संघावरील राष्ट्रवादीने उमेदवारीचा ताबा सोडलेला नाही. पक्ष नेत्यांनी कार्यकर्त्यांची मागणीचा विचार करून मतदार संघात उमेदवारी दिली पाहिजे. पक्षाचे तिकीट मिळो अथवा ना मिळो विधानसभेची निवडणूक ही वाघ परिवार लढणारच असल्याचे प्रतिपादन पक्षाचे नेते संजय वाघ यांनी केले. पक्षाच्या आढावा बैठकीत मतदार संघात शरद पवारांनी उमेदवारी द्यावी, असा दृढनिर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी वेळप्रसंगी पक्ष नेतृत्वासोबत झगडावे लागले तरी चालेल, अशी कणखर भूमिका कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षांसमोर मांडली. आढावा बैठकीत मतदार संघात पक्षाच्यावतीने आमदारकीची निवडणूक लढण्याचा सुर कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी व्यक्त केला.

पाचोरा-भडगाव मतदार संघात आगामी विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी आणि निवडणूक लढण्याच्या पार्श्वभूमीवर महालपुरे मंगल कार्यालयात पाचोरा-भडगाव मतदार संघातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पक्षाचे नेते संजय वाघ यांच्या अध्यक्षतेखाली आणि नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली नुकतीच घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती

यावेळी डाॅ.संजीव पाटील, कार्याध्यक्ष शालिकग्राम मालकर, भडगावचे माजी नगराध्यक्ष श्याम भोसले, प्रवक्ते खलील देशमुख, प्रकाश निकुंभ, सीताराम पाटील, पाचोरा, भडगाव तालुकाध्यक्ष विकास पाटील, विलास पाटील, राहुल पाटील, कुणाल पाटील, अझहर खान, अशोक मोरे, सतिष चौधरी, प्रकाश भोसले, हारूण देशमुख, भगवान मिस्तरी, महिला पदाधिकारी रेखा देवरे, सुरेखा पाटील, स्नेहा गायकवाड, भूषण वाघ, बंटी माळी, गोपी पाटील, संजय सूर्यवंशी यांच्यासह दोन्ही तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कितीही योजना जाहीर केल्या तरी राज्यात बदल होणार

महाविकास आघाडीच्यावतीने उमेदवारी देण्यासंदर्भात अजुनपर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही. पक्षश्रेष्टींच्या निर्णयानुसार जागा वाटपचे निर्णय होतील. पक्ष ज्यांना उमेदवारी देईल त्यांचे काम करू. पाचोरा-भडगाव आणि चाळीसगाव या दोन्ही जागा राष्ट्रवादी पक्षाच्याच असल्याने कार्यकर्त्यांच्या मनासारखा निर्णय अपेक्षित राहील. कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेले विचार, सूचना, मागणी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचविण्यात येईल. महायुतीचे सरकार आणि मुख्यमंत्री निवडणुकीला घाबरले असल्यामुळे विविध योजना जाहीर करून जनतेच्या कररुपी पैशातून ‘जनतेचा कोथळा काढून आवळा’ देत आहेत. त्यांनी सत्ता टिकविण्यासाठी कितीही योजना जाहीर केल्या तरी महाराष्ट्रात बदल होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी सांगितले.

मतदारसंघातील जनतेत सुरू असलेला संभ्रम केला दूर

भाजपाने शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष फोडले. पक्षाचे दोन तुकडे झाल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. हा मतदारसंघ कै. आमदार सुपडु आण्णा पाटील, के.एम. बापु पाटील, ओंकार आप्पा यांच्या पुरोगामी विचारांचा आहे. ओंकार आप्पा आणि दिलीप वाघ यांनी सत्तेत असतांना मतदार संघात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय दिला. म्हणूनच कार्यकर्ते आमच्याकडे टिकुन आहे. सध्या आमदारकीच्या निवडणुकीला अनेक जण उतावीळ झाले असून मीच आमदार असल्याच्या अविर्भावात वागत असल्याचे अध्यक्षीय भाषणात संजय वाघ यांनी सांगितले.

आ.किशोर पाटील यांच्यावर टीका करताना ते पुढे म्हणाले की, आमदारांनी शेतकरी, बेरोजगार यांच्यासाठी काय केलं? मतदार संघात आजही अनेक समस्या आहेत. काहीही झाले तरी आमदारकीची निवडणूक वाघ परिवार लढणारच, असा संदेश कार्यकर्त्यांना देऊन मतदारसंघातील जनतेत सुरू असलेला संभ्रम दूर केला. सुत्रसंचलन तथा आभार माणिक पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here