चेन स्नॅचिंग करणारे दोघे पकडले

0
14
महिलेचे-मंगळसूत्र-धूमस्टाईल-ओरबाडले-रामानंद-नगर-परिसरातील-घटना-saimatlive.com

साईमत, एरंडोल : प्रतिनिधी

शहरातील एक महिला पहाटे मॉर्निंग वॉकला जात असतांना चोरट्यांनी गळ्यातील १८ ग्रॅम वजनाची सोन्याची अर्धी पोत लांबविणाऱ्या तिघांपैकी दोन संशयितांना पकडण्यात एरंडोल पोलिसांना यश आले आहे.

सविस्तर असे की, एरंडोल येथे विमलबाई चौधरी यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्यातील संशयित आरोपी चोरटे हे चाळीसगाव येथील मुसा कादरी बाबा दर्गा येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यावरुन एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. गणेश अहिरे, पो.उ.नि. शरद बागल, पो.कॉ. अनिल पाटील, पो.ना. मिलिंद कुमावत, अकिल मुजावर आदींनी चाळीसगाव येथे जाऊन सापळा रचला. आरोपींना पोलिसांचा संशय आल्याने त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यात दोघांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यात सय्यद तोशिब तय्यब अली (वय २४, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) आणि आकाश राजू खरे (वय २०, रा. दूध फेडरेशन, जळगाव) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १८ ग्रॅम वजनाची सोन्याची तुटलेली पोत हस्तगत केली आहे. तपास स. पो. नि. गणेश अहिरे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here