यावल नगरपरिषदेचे होतेय दुर्लक्ष
साईमत/यावल/प्रतिनिधी
यावल येथे बुरुज चौकापासून बस स्टॅन्डपर्यंत असलेल्या दुभाजकांमध्ये यावल नगर परिषदेने फुलझाडे लावलेली आहेत. परंतु फुलझाडांना नियमित पाणी दिले जात नसल्याने फुलांची झाडे कोमजण्याच्या मार्गावर असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. त्यामुळे फुलझाडे नष्ट होऊ शकतात. याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे यावल नगरपरिषदेने तात्काळ दुभाजकामधील फुल झाडांना पाणी देण्याची कार्यवाही करावी, अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.