चोपड्यातील प्रताप विद्या मंदिराची उत्तुंग यशाची परंपरा कायम

0
13

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिराची विद्यार्थिनी दिव्या गजानन पाटील हिने ९७.४० टक्के गुण मिळवून प्रथम येत कॉपीमुक्त वातावरणात शाळेची उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. शाळेचा निकाल ९७.६१ टक्के लागला असून उर्दू विभागाचा ९८.११ टक्के लागलेला आहे. टेक्निकल विभागाचा १०० टक्के निकाल लागला आहे. दहावी बोर्ड परीक्षेला शाळेतून ३७८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळणारे ३५ विद्यार्थी तर विशेष प्राविण्यासह १७६ विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत १२३ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.

विद्यालयातून प्रथम दिव्या गजानन पाटील ९७.४०, द्वितीय प्रथम गुरुदास पाटील ९६.६०, तृतीय रेहान हारुण तेली ९५.८०, चतुर्थ जीवन खुशाल पाटील ९५.६० तसेच पाचव्या क्रमांकाने पुष्कर नरेंद्र आके हा विद्यार्थी ९५.२० गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. उर्दू विभागातून इनाया इफरा इद्रिस हुसैन अन्सारी हिने ८७ टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्षा शैलाबेन मयूर, चेअरमन राजा मयूर, उपाध्यक्ष विश्‍वनाथ अग्रवाल, सचिव माधुरी मयूर, संस्था संचालक उर्मिलाबेन गुजराथी, चंद्रहासभाई गुजराथी, भूपेंद्र गुजराथी, रमेश जैन, सर्व सभासद, संस्थेचे समन्वयक गोविंद गुजराथी, प्रशालेचे मुख्याध्यापक पी. एस. गुजराथी, उपमुख्याध्यापक पी. डी. पाटील, उपप्राचार्य जे. एस. शेलार, पर्यवेक्षिका माधुरी पाटील, पर्यवेक्षक एस. एस. पाटील, पर्यवेक्षक ए. एन. भट तसेच सर्व शाखांचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांसह पालकांचे कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here