Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»The third session of ‘PHALI-2025’ : ‘फाली-२०२५’ च्या तिसऱ्या सत्राचा समारोप ; इनोव्हेशनमध्ये सांगली, बिझनेस प्लॅन स्पर्धेत पुणे जिल्हा प्रथम
    कृषी

    The third session of ‘PHALI-2025’ : ‘फाली-२०२५’ च्या तिसऱ्या सत्राचा समारोप ; इनोव्हेशनमध्ये सांगली, बिझनेस प्लॅन स्पर्धेत पुणे जिल्हा प्रथम

    Vikas PatilBy Vikas PatilMay 4, 2025No Comments4 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ‘फाली-२०२५’ च्या तिसऱ्या सत्राचा समारोप ; इनोव्हेशनमध्ये सांगली, बिझनेस प्लॅन स्पर्धेत पुणे जिल्हा प्रथम

    जळगाव (प्रतिनिधी) –

    जैन हिल्स येथे ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ च्या अकराव्या अधिवेशनच्या तिसऱ्या सत्राचा आज समारोप झाला. इनोव्हेशन व अॅग्रीटेक बिझनेस प्लॅन स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. इनोव्हेशनमध्ये सांगली, बिझनेस प्लॅन स्पर्धेत पुणे जिल्हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.

    यावेळी आयटीसी कंपनीचे अॅग्री अॅण्ड आयटी बिझनेसेसचे गृप हेड शिवकुमार एस प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘फाली म्हणजे फ्युचर अॅग्रीकलर लिडर ऑफ इंडिया होय, त्याच फाली या शब्दाचा एफ- फॉर्मर सेंट्रीक, ए- अॅप्रेरिसियेट, एल – लार्ज गोल व लॉंग टर्म, आय – इनोव्हेशन; यावर काम केल्यास शेतीत बदल होऊ शकतात त्यासाठी प्रत्येकाने ध्येय उच्च ठेवले पाहिजे ते पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न असले पाहिजे.

    याप्रसंगी व्यासपीठावर इनोव्हेशन व बिझनेस मॉडेल स्पर्धेतील परिक्षकांसह जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, फालीच्या संचालिका नॅन्सी बॅरी, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल पाटील, सुनिल गुप्ता, अभिजीत जोशी, यूपीएलचे अमोल फाळके, अंजिक्य तांदळे, राकेश कुमार, कांजी परमार, गोदरेज अॅग्रोवेटचे स्वीटी वेगुंटा, मंगेश देशमुख, रविंद्र पठारे, स्टार अॅग्रीचे कैलास कालबंदे, प्रविणकुमार कासट, नाबार्डचे अमित तायडे, प्रॉम्पटच्या आयुषी मित्तल, दिव्या छांगलानी, व्हर्व फॉर्मस्टेचे विघ्नेश व्ही. जे., एसबीआय फाऊंडेशनचे किरण घोरपडे यांच्यासह कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    मान्यवरांच्या हस्ते दोघंही स्पर्धांमधील विजेत्यांना चषक, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. माजी फाली विद्यार्थी व शिक्षकांसह सहकार्य करणाऱ्या कंपनी प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. हर्ष नौटियाल यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

    स्मॉल गृप सेशनमधील चर्चेतील सहभागी विद्यार्थ्यांपैकी चैताली कलंबडे (गोंदिया), गौरी जैन (जयपूर), विद्याश्री पुजारी (पुणे) व माजी विद्यार्थी अर्थव गोसावी, विशाल माळी, शर्वरी झाल्टे यांनी मनोगत व्यक्त केले. कंपनी प्रतिनिधींनीसुद्धा संवाद साधला.

    अल्पभुधारक शेतकऱ्यांबाबत विचार केला पाहिजे. शेतीत संकटे आहेत मात्र ती कमी करण्यासाठी सोल्यूशनसुद्धा असतात त्याचा विचार फाली इनोव्हेशन स्पर्धेत दिसला. व्हॅल्यू अॅडीशनचा विचार करून उत्पन्न कसे वाढेल यासाठी ध्येयपूर्वक कार्य केले पाहिजे त्यासाठी बिझनेसमधील लॉर्ज गोल्स ठेवले पाहिजे. त्यात सातत्य असावे तंत्रज्ञानासह नवीन कल्पनांना पुढे आणले पाहिजे असे मनोगत शिवशंकर एस. यांनी व्यक्त केले.

    अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना जैन इरिगेशनचे अनिल जैन म्हणाले की, भारत २०४७ मध्ये विकसित राष्ट्र म्हणून पुढे येण्याची जबाबदारी फालीच्या कृषीक्षेत्रातील भविष्यदर्शी नेतृत्त्वाची आहे. भारताच्या कृषी क्षेत्राचा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आवाका मोठा आहे कोरोना काळात भारत बंद असताना कृषी क्षेत्र थांबले नाही कितीही एआय आले तरी अन्न हे जमिनीतून उगवावे लागेल त्यामुळे भारत विकसित राष्ट्र करायचे असेल तर शेती तंत्रज्ञानासह करावी लागेल. शेतकरी कठिण परिस्थीतही उत्पन्न घेत असतो त्यांची मानसिकता कणखर असते याच मानसिकतेतून शेती केली पाहिजे. संघर्ष कितीही असो सोल्यूशन काढले पाहिजे त्यासाठी मानसिकता महत्त्वाची आहे. प्रवासात चढ उतार येतात शॉर्टकट कधीही मारू नये संघर्षातून मिळालेले यश शाश्वत असते. सध्याच्या शैक्षणिक पद्धतीमध्ये कृषिविषयक माहिती पाहिजे तितक्या प्रमाणात नाहीय. त्यामुळे फालीसारख्या कृषिविषयक प्रात्याक्षिकांसह नाविन्यपूर्ण संशोधनाला चालना देणाऱ्या उपक्रमाची आवश्यकता आहे. शेतीविषयीची विचाराधारा बदलविण्यात फालीची मोठी भूमिका आहे. फाली हे ग्रामीण भागात, शेती व शेतीपूरक उद्योग क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्यांसाठी उत्प्रेरक आहे. स्वत:च्या मनातील विचार बदला तरच सामाजिक स्तरावर शेतीला सन्मान मिळेल शेतीतून भारताचे भविष्य घडेल फालीचे काही माजी विद्यार्थी स्वत: व्यवसायिक झाले आहेत. ते रोजगार निर्मिती करत आहेत अर्थव गोसावी (सांगली) याने आपल्या व्यवसायातील प्रगती विषयी सांगितले. फाली विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, इंटरर्नशीप आणि व्हेंचर फडिंगच्या माध्यमातून मदत करत असल्याचेही त्यांनी सांगितले , अशी माहिती पत्रकारांशी संवाद साधताना जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी दिली. नॅन्सी बॅरी यांनी आभार मानले. हर्ष नौटियाल, रोहिणी घाडगे यांनी सूत्रसंचालन केले.

    फाली अधिविशेनाच्या तिसऱ्या सत्रात जैन हिल्सच्या आकाश ग्राऊंडवर अॅग्रीटेक इनोव्हेशन स्पर्धा घेण्यात आली. त्यात राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात व महाराष्ट्रातून ४९ इनोव्हेशन फालीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. लाईफ सेव्हींग शूज हे मॉडेल महात्मा गांधी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय (आष्टा, सांगली) यांचा प्रथम क्रमांक आला. द्वितीय श्री यमायी श्रीनिवास विद्यालय, औंध सातारा- (ओनियन अॅण्ड गार्गिलीक लिफ कटर), तृतीय एस. एस. लिगार्डे विद्यालय, अकोला वासूद जि. सोलापूर-(मॅझीक ट्रॅक्टर), जयश्री पेरीवल इंटरनॅशनल स्कूल जयपूर -(अॅग्री चार्ज इफिशन्सट सोलार पॅनल सेटिंग) चतुर्थ तर खान्देश गांधी बाळूभाई मेहता विद्यालय कासारे धुळे -(प्रोटेबल चाफ सेपरेटर) यांचा पाचवा क्रमांक आला.

    जैन हिल्सच्या परिश्रम हॉल, बडी हांडा हॉल, कस्तूरबा हॉलसह क्लासरूमध्ये एकाच वेळी फालीच्या विद्यार्थ्यांनी ४९ बिझनेशन प्लॅनचे सादरीकरण केले. यात प्रथम क्रमांकाने ग्रामप्रबोधनी विद्यालय, साळूंब्रे जि. पुणे -(ड्राय पावडर व्हेजीस) तर आदर्श माध्यमिक विद्यामंदिर विटा जि. सांगली -(पेटल रिव्होल्यूशन) द्वितीय, श्रीराम विद्यालय नवलाख ऊंब्रे जि. पुणे -(व्हर्मी कंपोस्ट) तृतीय, न्यू इंग्लीश स्कूल फॉर गर्ल्स आष्टा सांगली -(ओनियन आईल अॅण्ड शॉम्पू प्रोडक्शन) चतुर्थ, खान्देश गांधी बाळूभाई मेहता विद्यालय कासारे धुळे -(करंज ऑईल अॅण्ड पावडर प्रोडक्शन) पाचवा क्रमांक मिळाला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Jamner : चिल्ड्रन्स हार्ट फाऊंडेशन कडुन गरजूंना ब्लॅकेट वाटप.

    December 19, 2025

    Entrepreneur Attacked Brutally : उद्योजकावर जीवघेणा हल्ला ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

    December 18, 2025

    Jalgaon : विद्यापीठात संरक्षणशास्त्रावरील आठ संदर्भ ग्रंथांचे

    December 18, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.