दोन्ही शहरातील प्रवासाला अधिक चालना मिळणार
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
मनमाड-जळगाव दरम्यान १६० कि.मी. अंतराची तिसरी रेल्वेलाईन सुरू केली आहे. मनमाड आणि जळगाव अशा दोन्ही शहरातील प्रवासाला अधिक चालना मिळणार आहे. मध्य रेल्वेने १६० कि.मी. लांबीच्या मनमाड-जळगाव तिसऱ्या मार्ग प्रकल्पाची यशस्वीरित्या सुरू करण्यात आली. या प्रकल्पामुळे मार्गावरील वाहतूक क्षमता, गती आणि रेल्वेची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल.
मनमाड-जळगावच्या तिसऱ्या रेल्वेलाईन प्रकल्पाचा शेवटचा १०.४ किमीचा भाग, पिंपळखेरी-नांदगाव, रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी तपासणी केली. गती चाचणीनंतर हा रेल्वे मार्ग कार्यान्वित केला. यावेळी सीएओ (बांधकाम) मुख्यालय अविनाश पांडे, डीआरएम भुसावळ, पुनीत अग्रवाल, डीसीई (बांधकाम) किशोर सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सीआरएसने पिंपळखेर आणि नांदगाव स्थानकांची तपासणी केली. स्थानक सुरक्षा, पायाभूत सुविधांची तयारी आणि सद्यस्थितीच्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला आहे.
रेल्वे मार्गाच्या चाचणी दरम्यान इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हने १३१ कि.मी./तास वेगाने चाचण्या पूर्ण केल्या. त्यात या विभागाची सुरक्षितता आणि ऑपरेशनल क्षमता कशी असेन त्याची तपासणी करण्यात आली. दरम्यान, हा तिसरा मार्ग प्रकल्प मुंबई-कोलकाता मार्गाचा एक महत्त्वाचा भाग असून जो जड वाहतुकीसाठी ओळखला जातो. या नवीन मार्गामुळे प्रवासी आणि मालवाहतूक गाड्यांची गती वाढेल. कार्यक्षमता लक्षणीयरित्या सुधारणार आहे.
दरम्यान, प्रकल्प खर्च १ हजार ८५० कोटी रुपये होता. या १६० अंतराच्या मार्गावर एक महत्त्वाचा मोठा पूल, २२ मोठे आणि २९५ छोटे पूल, सात आरयूबी आणि १२ नवीन स्टेशन इमारती बांधण्यात आल्या आहेत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या मार्गावर सिग्नलिंग आणि टेलिकॉममध्ये ११ नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, १ पॅनेल इंटरलॉकिंग आणि १० इंटरमीडिएट ब्लॉक हटचा समावेश आहे. यासह १६ ब्लॉक विभागांमध्ये ब्लॉक प्रोव्हिंग बाय अॅक्सल काउंटर (बीपीएसी) बसविण्यात आले. पिंपार्कडेड-नांदगाव विभागात एक मोठा पूल, दोन मोठे आणि ३० छोटे पूल बांधण्यात आले आहेत.
ऑपरेशनल कार्यक्षमता वाढली
विद्यमान इंटरलॉकिंग्ज आणि आरआरआयमध्ये आवश्यक सुधारणा केल्या आहेत. ईयूआर, बीएलसी आणि इतर मालवाहतूक गाड्यांचे सुरळीत संचालन निश्चित करण्यासाठी नांदगाव येथील यार्ड लेआउटमध्ये सुधारणा करण्यात आलीय. नांदगाव यूपी यार्डमधील १० कि.मी., ताशी कायमस्वरूपी वेग प्रतिबंध (पीएसआर) काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे ऑपरेशनल कार्यक्षमता वाढली आहे.
