प्रवाशांचे दोन मोबाईल लांबविणारा चोरटा ताब्यात

0
45

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

जळगाव बसस्थानकात आलेल्या दोन प्रवाशांचे मोबाईल चोरी झाल्याची घटना १ जून रोजी दुपारी १२ वाजता घडली होती. या गुन्ह्यातील चोरट्याला अवघ्या ४ तासात जिल्हापेठ पोलिसांनी बसस्थानक आवारातून मुजीबुर रहमान मोहम्मद इस्माईल (वय २५, रा. गुलशन नगर, मालेगाव, ता. नाशिक) याला अटक केली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल केला होता.

जळगाव शहरातील विठ्ठलपेठ येथील राहणारे सुरज संजय बारी हे रेल्वेत हेल्पर म्हणून नोकरीस आहे. १ जून रोजी ते भुसावळ येथून जळगाव येथे बसने आले. दुपारी १२ वाजता नवीन बसस्थानक येथे ते बसमधून उतरल्यावर त्यांना पॅन्टच्या खिशातून मोबाईल चोरीस गेल्याचे लक्षात आले. दरम्यान, याच बसमधील संतोष लक्ष्मण वानखेडे (वय ४३, रा. अनुराग स्टेट बँक कॉलनी) यांच्या शर्टाच्या खिशातून चोरीला गेला होता. यावेळी बारी यांनी लागलीच जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश मानगावकर यांनी लागलीच गुन्हेशोध पथकातील पो.हे.कॉ. सलिम तडवी, पो.कॉ.तुषार पाटील व जयेश मोरे यांचे पथक रवाना केले.

पथकाने संशयास्पदरित्या फिरणाऱ्या मुजीबुर रहमान मोहम्मद इस्माईल याला बसस्थानक आवारातून दुपारी ४ वाजता ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यावर त्याच्याकडे चोरलेले दोन मोबाईल मिळून आले. पोलिसांनी ते मोबाईल हस्तगत केले आहे. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल पल्लवी मोरे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here