यशाबद्दल अनेकांनी केले कौतुक
साईमत/पहुर, ता.जामनेर/प्रतिनिधी :
येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फूले माध्यमिक विद्यालयाच्या मुलीच्या संघाने तालुका स्तरीय खो -खो स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. जामनेर येथिल लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कुलच्या मैदानावर क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय शालेय खो -खो स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात पहुर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील १४ वर्षाच्या आतील व १७ वर्षाच्या आतील वयोगटातील मुलीच्या दोन संघाने सहभाग नोंदविला. त्यातील १७ वर्षाखालील वयोगटातील मुलीच्या संघाने उपविजेतेपद पटकाविले. क्रीडा शिक्षक हरीभाऊ राऊत, संघ व्यवस्थापक कल्पना बनकर यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले तर चंदेश सागर, सुनील पवार यांचे सहकार्य मिळाले. संघाचे नेतृत्व खुशी गणेश घोंगडे हिने केले.
संघात ऐश्वर्या प्रजापत, कल्याणी लहासे, जयश्री राठोड, जागृती चव्हाण, जागृती पंडीत चव्हाण, धनश्री घोंगडे,नंदनी क्षीरसागर, प्रतीक्षा गोंधनखेडे, बिजली राठोड, भाग्यश्री घोंगडे, ममता तडवी, ममता घोंगडे, रोशनी मालकर, हर्षली जाधव यांचा सहभाग होता. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे, सचिव भगवान घोंगडे, मुख्याध्यापिका वैशाली घोंगडे यांच्यासह सर्व संचालक मंडळ क्रीडा समन्वयक डॉ.आसिफ खान, महेश पाटील, कपिल शर्मा, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांंनी अभिनंदन केले आहे.