सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाचा संघ प्रथम

0
20

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात स्व.संदीप चव्हाण राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचा समारोप समारंभाचे समारोपकर्ते चाळीसगावचे तहसीलदार प्रशांत पाटील, नायब तहसीलदार संदेश निकुंभ यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि.चाळीसगाव संस्थेचे सचिव बाळासाहेब चव्हाण होते.

व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन डॉ.विनायक चव्हाण, संचालक प्रमोद पाटील, सुनील देशमुख, भाऊसाहेब पाटील, सोनूसिंग राजपूत, प्राचार्य डॉ.एस.आर.जाधव, उपप्राचार्या डॉ.उज्ज्वल मगर, उपप्राचार्य डॉ.जी.डी.देशमुख, स्पर्धा समन्वयक डॉ.के.बी.बेंद्रे, स्पर्धा मार्गदर्शक डॉ.के.सी.देशमुख, डॉ.आर.पी. निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील, संस्थेचे सचिव बाळासाहेब चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच स्पर्धेतील स्पर्धकांमध्ये ऋतुजा महाजन (धुळे), नागेश लाड(कन्नड) आणि ललित कुमार मालपुरे (धुळे) यांनी स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त केले.

स्पर्धेतील बक्षीसपात्र विजेते असे

स्व.संदीप चव्हाण राज्यस्तरीय वरिष्ठ व कनिष्ठ आंतर महाविद्यालयीन सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यात प्रथम पारितोषिक-कैलास पाटील, अजय कोळी यांना स्मृतीचषक, ३ हजार रुपये स्मृतीचिन्हासह प्रमाणपत्र- प्रताप महाविद्यालय, अमळनेर, द्वितीय पारितोषिक-ललितकुमार मालपुरे, ऋतुजा महाजन यांना २ हजार रुपये स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र एस.एस.व्ही.पी.एस.संस्थेचे कै. डॉ.पी.आर.घोगरे विज्ञान महाविद्यालय, धुळे, तृतीय पारितोषिक-अश्विनी पाटील, संकेत पवार यांना १ हजार रुपये स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र – गिरणा विद्या प्रसारक संस्थेचे गिरणा माध्यमिक आणि ज्युनिअर कॉलेज, मेहुणबारे, उत्तेजनार्थ पारितोषिकात उत्कृष्ट स्पर्धक विद्यार्थिनी उन्नती शिंदे-नानासाहेब य.ना.चव्हाण महाविद्यालय, चाळीसगाव ५०० रुपये, स्मृतीचिन्हासह प्रमाणपत्र, उत्कृष्ट स्पर्धक विद्यार्थी ललित कुमार मालपुरे-एस.एस.व्ही.पी.एस.संस्थेचे डॉ.पी.आर.घोगरे विज्ञान महाविद्यालय, धुळे ५०० रुपये स्मृतीचिन्हासह प्रमाणपत्र देण्यात आले.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.एस.आर.जाधव, उपप्राचार्या डॉ.उज्ज्वल मगर, उपप्राचार्य डॉ.जी.डी.देशमुख यांनी मार्गदर्शन केले. तसेच डॉ.के.सी.देशमुख, डॉ.आर.पी.निकम, स्पर्धा समन्वयक डॉ.के.बी.बेंद्रे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक तथा अहवाल स्पर्धा समन्वयक डॉ.के.बी. बेंद्रे, सूत्रसंचालन डॉ. निमा गोल्हार, डॉ. मंगला सूर्यवंशी तर आभार डॉ. जी.डी.देशमुख यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here