Amalan school, Balkisan Thombare : नवापूर तालुक्यातील आमलाण शाळेचे शिक्षक बाळकिसन ठोंबरे यांना पुरस्कार जाहीर

0
22

विद्यार्थी गुणवत्तेसाठी शाळांमध्ये राबविलेल्या विविध उपक्रमांची दखल

साईमत/नंदुरबार/प्रतिनिधी :

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता, सर्वांगीण विकासासाठी सतत कार्य तत्पर असणारे आपलं सर्वस्व विद्यार्थ्यांसाठी झोकून देणारे, शाळेच्या विकासासाठी झटणारे नवापूर तालुक्यातील आमलाण जिल्हा परिषद शाळेचे बाळकिसन विठ्ठल ठोंबरे यांना नुकताच ‘क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे..

गेल्या १६ वर्षात त्यांनी विद्यार्थी गुणवत्तेसाठी अनेक उपक्रम शाळांमध्ये राबवले. अनेक स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना यश मिळाले. कला, क्रीडा, संगीत याद्वारे विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण दिले. विशेष म्हणजे मागील दोन वर्षात ऑनलाईन अथवा ऑफलाइन पद्धतीने ३६५ दिवस शाळा केली, करत आहेत. त्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार त्यांना जाहीर झाला.

यांनी केला अभिनंदनाचा वर्षाव

याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेंद्र महाजन, रमेश चौधरी, प्रदिप पाटील, विनोद लवांडे, श्री.वसावे, उपशिक्षणाधिकारी श्री लोहकरे, वंदन वळवी, युनूस पठाण, गटशिक्षणाधिकारी रमेश देसले, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश चौरे, रेखा पवार, केंद्र प्रमुख भगवान सोनवणे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here