Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»विद्यार्थ्यांनी गादी उचलली अन्‌‍‍ सापडला मित्राचा मृतदेह; आश्रमशाळेतील प्रकार
    क्राईम

    विद्यार्थ्यांनी गादी उचलली अन्‌‍‍ सापडला मित्राचा मृतदेह; आश्रमशाळेतील प्रकार

    saimatBy saimatAugust 31, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वर्धा :

    वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील एका आश्रमशाळेतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारंजा तालुक्याती नारा येथील एका आश्रमशाळेत बारा वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यूनंतर आश्रमशाळेत एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील आश्रमाशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा वारंवार ऐरणीवर आला आहे. दरम्यान, आश्रमशाळेत असणाऱ्या गादीखाली या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

    शिवम सनोज उईके असं बारा वर्षीय मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. शिवम अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट येथील चिखलदरा तालुक्याच्या डोमा येथील राहणारा होता. शिवमचा संशयास्पद मृतदेह परिस्थितीत मृतदेह सापडल्याने कारंजा परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र शिवमचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

    बुधवारी सकाळी साडे नऊ वाजता शिवम शेवटचा दिसला होता. मात्र त्यानंतर रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास इतर विद्यार्थी झोपण्याची तयारी करत होते. विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी देण्यात आलेल्या गाद्या या एकावर एक रचून ठेवण्यात आल्या होत्या. झोपण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्या गाद्या काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर एका गादीखाली शिवमचा मृतदेह विद्यार्थ्यांना सापडला. हा प्रकार पाहून घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांना याची माहिती दिली. शिक्षकांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर कारंजा घाडगे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

    दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तर या घटनेची माहिती समजताच मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून या प्रकरणाचा कसून तपास करण्यास सांगितले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Pachora : पाचोर्‍यात वॉटर हिटरचा शॉक फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू

    March 11, 2026

    Jalgaon: जळगावात वडिलांच्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी घरकुल चौकात गोळीबार

    March 11, 2026

    Chalisgaon : चाळीसगावात आरपीएफ जवानाच्या घरात धाडसी चोरी

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.