साईमत लाईव्ह धानोरा ता. चोपडा प्रतिनिधी
यावल तालुक्यातील चिंचोली गावापासून उत्तरेला सातपुड्याच्या पर्वतात असलेला मनुदेवी चा धबधबा पर्यटकांना भुरळ घालतोय. सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून सातपुड्याच्या परिसरात असलेले मनुदेवी मंदिरा जवळील पांढराशुभ्र धबधबा निखळपणे ओंसडून वाहत आहे तर हिरवळीने हा परिसर नटला असुन जनु निसर्गाने हिरवा शालु परिधान केलेला दिसुन येत आहे. दरम्यान, पर्यटकांची व भाविकांची मदीयाळी पाहता या परिसरात वावरतांना पर्यटकांनी हलगर्जीपणा करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
हा धबधबा सुरू झाला की जिल्ह्यासह महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून भाविक व पर्यटक मनुदेवी चा धबधबा पाहण्यासाठी येत असतात. शनिवार व रविवारी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची व भाविकांची गर्दी दिसून येते.सध्या सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यांमधून वाहत येणाऱ्या या पावसात दगड गोटे माती व लाकडाचे ओडके धबधब्याच्या पाण्यासोबत वाहत येत असल्याने धबधबा कडे जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
सातपुड्यातील श्रीक्षेत्र मनुदेवी परिसरात सध्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी सुरू असून भाविकांनी व पर्यटकांनी मनुदेवी धबधबा खाली व जवळपास आंघोळीसाठी जावु नये असे आवाहन ही मनुदेवी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. दि.१८ सोमवार पासून रोजी सातपुड्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असुन कोठवाय नदीला पूर आला होता. त्यामुळे पर्यटक व भाविकांनी आपली वाहने नेतांना पावसाच्या पाण्याचा अंदाज पाहुनच प्रवास करावा. कारण नदीला पूर आल्याने रस्त्यावर दगड गोटे व खड्डे निर्माण होण्याची शक्यता असल्याने पर्यटकांनी हलगर्जीपणा करू नये असे आवाहन ही मनुदेवी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.