‘Shankarsheth’ Mumbai Terminal : समाजसुधारक ‘शंकरशेठ’ यांचे मुंबई टर्मिनलला नाव द्यावे

0
14

जळगावात सुवर्णकार समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा, मागण्यांचे दिले निवेदन

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

मुंबई प्रांतासह अखंड हिंदुस्थानचे शिल्पकार तथा महान समाजसुधारक नामदार ‘शंकरशेठ’ यांचे नाव मुंबई टर्मिनलला देण्यात यावे तसेच संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजासाठी तात्काळ तीन अशासकीय सोनार समाजाचे सदस्य नियुक्त करून महामंडळाचे कार्य प्रारंभ करण्यात यावे, अशा मागण्यांचे निवेदन जळगाव शहरातील सुवर्णकार अर्थात सोनार समाजाच्यावतीने तसेच महाराष्ट्र सुवर्णकार सेना, सोनार हितकारणी सभा, अहिर सोनार महिला मंडळ आणि ऋणानुबंध वधू-वर पालक मेळावा समिती, जळगाव जिल्हा सुवर्णकार कारागीर संघाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी, १९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांंची भेट घेऊन समाजातील विविध मागण्यांवर चर्चा करण्यात येऊन निवेदन सादर करण्यात आले.

समाजाच्या मागण्यांसाठी लवकरात लवकर सकारात्मक निर्णय व्हावा, अशी अपेक्षा उपस्थित पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. सुवर्णकारांच्या प्रमुख मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. याप्रसंगी माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष संजय विसपुते, सचिव संजय पगार यांच्यासह समस्त सुवर्णकार बांधव, पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here