Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राष्ट्रीय»संसद भवनाच्या सुरक्षेची जबाबदारी आता सीआयएएसएफकडे
    राष्ट्रीय

    संसद भवनाच्या सुरक्षेची जबाबदारी आता सीआयएएसएफकडे

    Kishor KoliBy Kishor KoliDecember 21, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    लोकसभेचे कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी सभागृहात घुसून राडा केल्याच्या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने संसद भवन परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्योरिटी फोर्सकडे (सीआयएएसएफ) सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. सीआयएसएफ हे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे, जे देशातील वेगवेगळ्या सरकारी संस्था, मंत्रालयांच्या इमारती, अणूऊर्जा प्रकल्प, अंतराळ संस्थेची ठिकाणं आणि विमानतळांना संरक्षण देतं.
    दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने सीआयएसएफला संसद भवन संकुलाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता सीआयएसएफ आणि अग्निशमन दल मिळून संसद परिसरात अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यासाठी एक आराखडा तयार करतील. संसदेची सुरक्षा व्यवस्था पाहणाऱ्या सुरक्षा पथकासह सीआयएसएफ संसद भवन परिसराचं सर्वेक्षण करणार आहे. आठवडाभर अभ्यास करून सुरक्षेच्या दृष्टीने एक आराखडा तयार करून गृहमंत्रालयासमोर सादर केला जाईल. सीआयएसएफच्या जवानांबरोबर संसदेची सध्याची सुरक्षेची जबाबदारी पाहणारं पथक, दिल्ली पोलीस आणि सीआरपीएफचं पथक संयुक्तपणे संसद भवनाचे संरक्षण करतील.
    संसदेत झालेल्या घुसखोरीनंतर केंद्र सरकारने संसद परिसराच्या सुरक्षेची समीक्षा करण्यासाठी सीआरपीएफचे महासंचालक अनीश दयाल सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीच्या शिफारसींच्या आधारावर संसदेची सुरक्षा व्यवस्था चोख आणि भक्कम केली जाईल. सीआयएसएफ हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे केंद्रीय पोलीस दल आहे. १५ मार्च १९६९ रोजी सीआयएसएफची स्थापना करण्यात आली होती. १५ जून १९८३ रोजी ते सशस्त्र दल बनलं. सीआसएसएफची एक वेगळी अग्निशमन शाखादेखील आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    ‘Jain Irrigation’ Company From Jalgaon : जळगावातील ‘जैन इरिगेशन’ कंपनी निर्यातीबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

    September 9, 2025

    ‘mock drills’ : सर्व राज्यांत ‘मॉक ड्रिल’ घ्या, गृहमंत्रालयाचे निर्देश

    May 5, 2025

    Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधातील याचिका फेटाळली ; दुहेरी नागरिकत्त्वाच्या आरोपाबाबत दिलासा

    May 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.