महसूलच्या पथकाने तीस ब्रास वाळूचा साठा पकडला

0
12

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील बांभोरी गावाजवळील मोकळ्या जागेत अवैधरित्या वाळूचा साठा महूसल पथकाला शनिवारी, १९ ऑगस्ट रोजी पहाटे आढळून आला. महसूल पथकाने वाळूचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी एकावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

जळगाव तालुक्यातील वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. दरम्यान महसूल आणि पोलीस प्रशासनाच्यावतीन १९ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजता धडक मोहीम राबवित अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोठी कारवाई केली. त्यानंतर वाळू साठा करणाऱ्यांवरही कारवाई केली. गिरणा नदीच्या काठावरील बांभोरी गावातील मोकळ्या जागेत १९ ऑगस्ट रोजी पहाटे दोन ठिकाणी ९६ हजार रूपये किंमतीचा ३० ब्रास वाळूचा साठा महसूल प्रशासनाला आढळून आला. गिरणा नदीतून वाळूची चोरटी वाहतूक करून वाळूचा साठा जमा केल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी बांभोरी येथील तलाठी गजानन देविदास बिंदवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिमराव जंगलू नन्नवरे (रा. बांभोरी ता.धरणगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here