Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»The Revenue Fortnight Program : सेवासह महसूल पंधरवाडा कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी
    जळगाव

    The Revenue Fortnight Program : सेवासह महसूल पंधरवाडा कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 3, 2025Updated:September 3, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पूर्वतयारी बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे निर्देश

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  

    शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज अभियानातंर्गत सेवा पंधरवाडा, महसूल पंधरवाडा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार आहे. पंधरवाडा दरम्यान सर्व विभागांनी समन्वयाने काम करून कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश केंद्रीय क्रीडा-युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिले. कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात पूर्वतयारी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आयोजित केली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खा. स्मिता वाघ, आ.चंद्रकांत सोनवणे, आ.मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिकाचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आदी मान्यवर उपस्थित होते.

    सेवा पंधरवड्या दरम्यान, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत प्रत्येक तालुक्यात कार्यक्रमाचे आयोजन करून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात यावे, तीन टप्प्यात हा कायर्क्रम राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पाणंद रस्ते मोहीम, दुसऱ्या टप्प्यात सर्वांसाठी घरकुल उपक्रम, तिसऱ्या टप्प्यात नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात यावेत, ‘एक पेड माँ के नाम’ अतंर्गत महाविद्यालयातील युवकांचा सहभाग नोंदवून वृक्षारोपण कार्यक्रम, छत्रपती शिवाजी महाराज महासमाधान शिबिराचे आयोजन, रोजगार मेळावा, वैद्यकीय शिबिरे, जातीचे, उत्पन्नाचे, रहिवास प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात यावे, अशा सूचनाही श्रीमती खडसे यांनी दिल्या. सामान्य नागरिकांपर्यंत लाभ पोहचविण्यासाठी प्रत्येक विभागाने सुक्ष्म नियोजन करुन कार्यक्रम यशस्वी करावा.

    पंधरवड्यानिमित्त खासदार क्रीडा महोत्सवाचे जिल्ह्यात आयोजन करण्यात येणार आहे. महोत्सवात क्रीडा विभागाच्या विविध योजनांबद्दल जनजागृती करण्यात यावी. क्रीडा महोत्सवाच्या संदर्भात क्रीडा विभाग, विविध क्रीडा संघटनांनी नियोजन करावे, असेही त्या शेवटी म्हणाल्या.बैठकीत खा.श्रीमती स्मिता वाघ, आ.मंगेश चव्हाण, आ.चंद्रकांत सोनवणे यांनी पंधरवाडा कार्यक्रमासंदर्भात उपयुक्त सूचना मांडल्या.

    योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहचवावा

    महसूल व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी सेवा-पंधरवाडा व महसूल पंधरावाडा दरम्यान कार्यक्रमाचे आयोजन करुन नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहचवावा, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद प्रास्ताविकात म्हणाले. बैठकीच्या शेवटी राज्यमंत्री श्रीमती खडसे यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखीय कार्य करणाऱ्या संस्थांसह राष्ट्रीय खेळाडूंचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    February 26, 2026

    Jalgaon:जळगाव शहरात भरदिवसा ८ लाखांची रोकड लंपास; दुचाकी डिक्की फोडून चोरटा फरार

    February 26, 2026

    Chopra:१० हजारांच्या कर्जासाठी २ लाख व्याज भरूनही तरुणाची आत्महत्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.