साईमत जळगाव प्रतिनिधी
अवैध वाळू वाहतुकदारांवर कारवाई करताना संबंधित महसूल कर्मचारी, अधिकारी हे प्रसिद्धी माध्यमांच्या डोक्यावर खापर फोडून बातम्या प्रसिद्ध होतात. म्हणून कारवाई करावी लागते, असे सांगून प्रसिद्धी माध्यमांना बदनाम करीत आहेत. त्यामुळे अनेक अवैध वाळू वाहतूकदार हे प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींना शिवीगाळ दमदाटी मारहाण व जीवे ठार मारण्याची धमकी देत असतात. याबाबत आता सरळ संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची वेळ आली आहे. अवैध वाळू वाहतूक करताना जे गब्बर अवैध वाळू वाहतूकदार आहेत. संबंधितांना मासिक आपले जे वेळेवर देतात. त्यांच्यावर कारवाई न करता किरकोळ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर सतत कारवाई होत असते. दुसरीकडे दमदाटी, शिवीगाळ, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई शून्य होते. त्यामुळेही अवैध वाळू वाहतूकदारांमध्येच तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यात सध्या अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात गाजत आहे. शासन नवीन नियमाची घोषणा करीत असली तरी मात्र प्रत्यक्षात बऱ्याच ठिकाणी अवैध वाळू वाहतूकदार आपल्याला मिळत असलेल्या राजाश्रयामुळे प्रभावामुळे आणि मासिक हप्ते बाजीमुळे शासनाची व जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल करून शुद्ध फसवणूक करीत आहे. कारण गेल्या पंधरा दिवसांपूर्वी एका ठिकाणी एक हजार वाळू ब्रास साठा करून ठेवला असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार महसूल विभागाने मात्र कारवाई करताना १ हजार ब्रास वाळू असताना केवळ तीनशे ब्रास वाळू साठ्याचा पंचनामा केला याला काय म्हणावे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईची अपेक्षा
अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर जमा केल्यानंतर ते ट्रॅक्टर मालकाला परत करताना आरटीओचा रिपोर्ट आणा, हा कागद आणा तो कागद आणा, अशा अनेक त्रुटी काढून ट्रॅक्टर मालकांना त्रास देतात. वाळू वाहतूक प्रकरणात मोठ्या प्रमाणात दादागिरी सुरू आहे. कारवाई केल्यानंतर महसूल प्रसिद्धी माध्यमांनाही पूर्ण माहिती देत नसल्याने महसूलबाबतच आता संशय व्यक्त केला जात आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करून जे वाळू वाहतूकदार दादागिरी दमदाटी करतात, त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.