अपर पोलीस निरीक्षक अशोक नखाते यांच्या हस्ते ध्वजारोहण
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
गिरणा नदीच्या काठावरील निसर्गरम्य वातावरणात वसलेले जलाराम बाप्पा श्रीराम मंदिराशेजारील चेतना व्यसनमुक्ती केंद्रात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साह, देशभक्ती आणि सामाजिक जाणीवेच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी व्यसनमुक्त भारताची हाक देऊन तसा संकल्पही करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात जळगावचे अपर पोलीस निरीक्षक अशोक नखाते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत आणि मानवंदना देऊन देशभक्तीचा जयघोष करण्यात आला. याप्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक सोमनाथ विसपुते, सुशीला विसपुते, चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ.नितीन विसपुते, चेतना विसपुते, डॉ. दीपक वाणी, डॉ. सुनील कोतवाल, डॉ. समीर सोनार, दीपक संगीत, धर्मेंद्र सोनार, तुषार बागुल, अमोल सपकाळे, सुरेश पाटील, अविनाश बडगुजर, अमित माळी, लोकेश देवरे, निलेश काळे, स्वामी पाटील यांच्यासह नागरिक, सहकारी उपस्थित होते.
प्रत्येकाने चळवळीत सहभागी व्हावे
देशाच्या सर्वांगीण विकासासाठी व्यसनमुक्त आणि नशामुक्त भारत घडविणे अत्यावश्यक आहे. प्रत्येकाने अशा चळवळीत सहभागी व्हावे. विकसित भारताच्या निर्मितीत हातभार लावावा, असे अशोक नखाते यांनी मनोगतात सांगितले. तसेच त्यांनी चेतना व्यसनमुक्ती केंद्राच्या कार्याचे कौतुक करत समाजात व्यसनमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या त्यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. प्रास्ताविकात डॉ. नितीन विसपुते यांनी उपस्थितांना व्यसनमुक्त भारताच्या दिशेने एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. नशामुक्त भारत ही राष्ट्राच्या विकासाची किल्ली आहे. चला, स्वातंत्र्यदिनी आपण व्यसनमुक्त भारत घडविण्याचा संकल्प करू या, असेही त्यांनी आवाहन केले.
यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वातंत्र्यदिन साजरा केला. यशस्वीतेसाठी चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे सहकारी उमेश पाटील, प्रतीक सोनार, दीपक पाटील, किरण बाविस्कर, तुषार ठाकूर, जीवन पाटील यांच्यासह रुग्णमित्रांनी परिश्रम घेतले.