संचालक मंडळाला विश्वासात न घेता होतेय परस्पर शिक्षकांची भरती

0
9

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

येथील तहजीब नॅशनल उर्दु हायस्कूलमध्ये एक संचालक आणि सचिव उर्वरित संचालक आणि चेअरमन यांना विश्वासात न घेता परस्पर शिक्षक भरती करत आहेत. आता नवीन शिक्षक भरती कशी, कोणत्या आधारे करत आहे. जे नवीन शिक्षक भरती होणार आहे, त्यांचे प्रस्ताव कुठे आहे. जे शिक्षक सहावी ते आठवीसाठी भरती केली होती. ते नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना का शिकवित आहे. या शाळेत तुकड्या कोणाच्या परवानगी घेऊन बनविल्या आहे का? एका संचालकने आपल्या नातेवाईक शिक्षक असलेले त्यांच्या सोयीसाठी बनविले आहे. याबाबत जळगाव आणि नाशिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

सविस्तर असे की, औरंगाबाद येथून सचिव कोणते काम करणार आहे. याठिकाणी कोणते व किती पैसे भरले आहे, कधी उर्वरित संचालकांना विश्वासात घेऊन याबद्दल माहिती दिली आहे का? काय सुरु आहे या शाळेत समजेल का? नवीन शिक्षक भरती आता नातेवाईक आहे का, ओळखीचे, ते तरी सर्वांना विश्वासात घेतील का? शिक्षक भरती कोणत्या पद्धतीने होत आहे हे फक्त निर्णय एक संचालक व सचिव घेत असल्याचे सांगण्यात येते. शाळेत एक संचालक आणि सचिव मनमानी कारभार चालवितात. ते स्वतः निर्णय घेतात. नंतर ठराव आणि प्रस्तावावर चेअरमन, उर्वरित संचालकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात.

शिक्षक भरतीत प्रचंड घोटाळा
उर्वरित संचालकांना काही माहित नसतांना शिक्षक, क्लार्क, शिपाई भरती होते. नंतर उर्वरित संचालकांना माहिती होते का नवीन भरती केल्याची. नवीन शिक्षक भरतीवेळी शिक्षकांच्या मुलाखती कोणी घेतल्या? केव्हा घेतल्या? आणि कोणते शिक्षक होते मुलाखाती घेण्यासाठी व किती रक्कम भरतीची घेतली गेली, त्याचा हिशोब उर्वरित संचालक मंडळाच्या सदस्यांना सचिव देतील का? या शाळेत एका संचालक आणि सचिवाचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here