महिला सदस्यांच्या सक्रिय सहभागामुळे ‘सहल’ ठरली अविस्मरणीय
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
लाडशाखीय वाणी समाज सुमंगल महिला मंडळाच्यावतीने जळगाव ते उमाळा, अजिंठा व्हीव पॉईंट, आंबॠषी, सोनबर्डी महादेव मंदिर येथे महिलांची एक दिवसीय पावसाळी सहल नुकतीच उत्साहात पार पडली. सहलीत समाजातील १०० महिला सहभागी झाल्या होत्या. सहलीचे नियोजन व संकल्पना महिला मंडळाच्या अध्यक्षा सरला वाणी यांनी मांडली. ही सहल सर्व महिला सदस्यांच्या सक्रिय सहभागामुळे अविस्मरणीय ठरली.
समाजातील सर्व महिला सदस्यांना एकत्र आणणे, परस्परांमध्ये जिव्हाळा, संवाद व एकोपा वाढविणे, पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य, अध्यात्माचा अनुभव घेणे, असा सहलीचा उद्देश होता. प्रवास सुरू होण्यापूर्वी समाजाचे युवा नेते गजानन मालपुरे, शांतीलाल नावरकर यांच्या हस्ते गाडीचे पूजन करून सहलीचा प्रारंभ करण्यात आला.