नागपूर सुधार प्रन्यासचा प्रस्ताव धुळखात पडून

0
23

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

भुपृष्ठ तथा परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने नागपूर जिल्ह्यातील दिक्षाभूमी, चिंचोली व कामठीचे ड्रॅगन पॅलेस या तिन्ही धार्मिक स्थळांचे बुद्धिष्ट सर्कीट जाहीर करून त्याकरिता लागणारा एक कोटी रूपयांचा निधी केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेतून मंजूर करून घेण्याच्या सूचना त्यावेळचे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी नागपूर जिल्हा पर्यटन समितीची बैठक घेऊन तशा प्रकारचा ठराव पास करून नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर यांच्याकडे पाठविला होता. नागपूर सुधार प्रन्यासने बारीक-सारीक मुद्यांवर माहिती गोळा करून बुद्धिष्ट सर्किट जाहीर करण्याकरीता लागणारा खर्च ९६७ कोटी रूपये यावर सविस्तर प्रस्ताव तयार करून महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन सांस्कृतीक विभागाला पाठविण्यात आला होता. त्यापूर्वी नितीन गडकरी यांचे दिल्ली मुक्कामी सांगोपांग चर्चा करण्याकरीता बैठकही घेण्यात आली होती.

बैठकीत केंद्रीय पर्यटनमंत्री, राज्यमंत्री, प्रधान सचिव, महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी तसेच ना.सु.प्र.चे सभापती सुद्धा उपस्थित होते. त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे हे काम ना.सु.प्र. यांच्याकडे देण्याचेही ठरले होते. त्यानुसार नागपूर सुधार प्रन्यासने सर्व स्तरावरील माहिती गोळा करून ९६७ कोटी रूपये केंद्र शासनाच्या स्वदेश दर्शन योजनेतून मंजूर करून घेण्यात यावे, असा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडे २०१६ मध्ये नागपूर सुधार प्रन्यासने पाठविला होता. हा प्रस्ताव २०१६ पासून धुळ खात पडून असल्यामुळे नागपुरातील जागृत नागरिक मंच या सामाजिक संघटनेने माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल परूळकर, अध्यक्ष, बा.ना.ई. यांच्या नेतृत्त्वात ९ जानेवरी २०२४ रोजी नागपूरचे जिल्हाधिकारी विपीन कुमार इटनकर, भा.प्र.से. यांना शिष्टमंडळ भेटून मागणीचे निवेदन दिले.

शिष्टमंडळात जागृत नागरिक मंचाचे अध्यक्ष आर.एस. आंबुलकर, प्रा.डॉ. मुकूंद मेश्राम, रामभाऊ बागडे, हरिष जानोरकर, भीमराव म्हैस्कर, मनोहर गजभिये, राजकुमार मेश्राम, शैलेश बढेल, अब्दुल फैजान, डी.एम. बेलेकर, डॉ. प्रबोधन मेश्राम, पुरुषोत्तम गायकवाड आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here