संविधानामुळेच देशाची प्रगती : ॲड.मनोहर खैरनार

0
24

प्रत्येक नागरिकाने संविधानाचा आदर करणे गरजेचे

साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :

जगातील सर्वात सुंदर व आदर्श राज्यघटना म्हणजे भारतीय संविधान आहे. संविधानानेच देशाची प्रगती झाली आहे. आज संविधानाच्या मुळावर घाव घालण्याचे प्रकार सुरू आहेत. असे घडल्यास लोकशाही धोक्यात येऊन राष्ट्राच्या प्रगतीत अडथळे निर्माण होऊन राष्ट्राचे अस्तित्वच धोक्यात येईल. त्यामुळे संविधान व पर्यायाने राष्ट्र वाचण्याची जबाबदारी भावी पिढीवर असल्याचे प्रतिपादन ॲड.मनोहर खैरनार यांनी केले. ते मुक्ताईनगर येथील शासकीय तंत्र विद्यालय आयोजित संविधान मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी डी.पी.कोळी होते. प्रमुख पाहुणे म्हणून चांगदेव हायस्कुलचे मुख्याध्यापक विजय चौधरी, संत मुक्ताई पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद बोदडे उपस्थित होते. हा कार्यक्रम प्राचार्य एम.एस.राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

यशस्वीतेसाठी शासकीय तंत्र विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक नितेश शिरभाते, जोंधणखेडा औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे गणेश लिपिक, भांडार लिपिक भाग्येश चौधरी, निदेशक महेश बोरोले, सुभाष मराठे, हुसेन शेख, कर्मचारी शांताराम ढाके, नरेंद्र कुमार, मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेचे प्रशिक्षणार्थी कृष्णकांत पाटील यांनी परिश्रम घेतले.

शेवटी डी.पी. कोळी यांनी अध्यक्षीय भाषण करुन प्रत्येक नागरिकाने संविधानाचा आदर करणे गरजेचे असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन शरद बोदडे तर आभार फकीरचंद पिंप्राळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here