Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर
    अमळनेर

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJanuary 21, 2024No Comments5 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

    अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.रवींद्र शोभणे भूषविणार आहेत. संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर केली आहे. संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विशेष अतिथी म्हणून भाषा व शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत. समारोपाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ना.दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत.

    २ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वा. ग्रंथदिंडीचे उद्घाटन महमंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे व अशोक जैन यांच्या हस्ते होईल. १० वाजता प्रा.उषा तांबे ध्वजारोहण करतील. ग्रंथदालनाचे उद्घाटन पूर्व संमेलनाध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर तर प्रकाशन कट्टाचे उद्घाटन प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते होईल. सभामंडप क्रमांक १ खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर सकाळी १०.३० वाजता साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होईल. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे, पूर्व संमेलनाध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विशेष अतिथी म्हणून भाषा व शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत.

    दुपारी २ ते ३.३० वाजे दरम्यान बालमेळाव्यातील निवडक कार्यक्रमांचे सादरीकरण होईल. दुपारी ३.३० ते ५.३० दरम्यान राजकीय आणि सामाजिक प्रदूषण यावर ‘संत साहित्य हाच उपाय’ विषयावर परिसंवाद होईल. सायंकाळी ५.३० ते ८.३० वाजे दरम्यान कविसंमेलन पार पडेल. रात्री ८.३० ते १०.३० वाजे दरम्यान ‘छंद विठ्ठलाचा – भावसरगम’ हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडेल.

    सभामंडप क्र. २ कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात २ रोजी दुपारी २ ते ३.३० दरम्यान कसदार मराठी राजकीय साहित्याच्या प्रतीक्षेत वाचक, दुपारी ३.३० ते ४.३० सयाजीराव गायकवाड यांचे साहित्यिक व सामाजिक योगदान, दुपारी ४.३० ते ५.३० वा. तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान, सायं. ५.३० ते ७ वाजता ‘स्वातंत्र्य संग्रामातील जनजातींचे योगदान’ विषयावर परिसंवाद होतील. सभामंडप क्र. ३ बालकवी – त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृहात २ रोजी दुपारी ३ ते ७ कविकट्टा पार पडेल.

    ३ रोजी सभामंडप क्र. १ खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर सकाळी ९.३० ते ११ वाजता पद्मश्री गिरीश प्रभुणे यांची प्रकट मुलाखत होईल. रवींद्र गोळे (मुंबई), सारंग दर्शन (मुंबई) हे मुलाखत घेतील. सकाळी ११ ते १२.३० वा आजच्या मराठी साहित्यातून जीवन मूल्ये हरवत चालली आहेत का? दुपारी १२.३० ते २ वाजे दरम्यान ‘अलक्षित साने गुरुजी’ विषयावर परिसंवाद होईल. यावेळी श्रीमती सुधा साने यांचा सत्कार व मनोगताचा कार्यक्रम पार पडेल. दुपारी २ ते ३.३० वा ‘आंतरभारती काल-आज-उद्या’, सायं. ४ ते ५.३० वा ‘आठवणीतल्या कविता – रसास्वाद’ विषयावर परिसंवाद होतील. सायं. ६ ते ८ वाजता कविसंमेलन होईल. रात्री ८ ते १० वा ‘अरे संसार संसार: कवयित्री बहिणाबाई चौधरी’ यांच्या रचनांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम होईल.

    सभामंडप क्र. २ कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात ३ रोजी सकाळी १० ते ११ वाजता ‘ग्रामीण विकासाचे अर्थकारण व नियोजन’ विषयावर चैत्राम पवार यांची मुलाखत शशिकांत घासकडबी, नंदुरबार घेतील. सकाळी ११ ते १२.३० वाजता मराठी साहित्यात विनोदाचे गांभीर्याने चिंतन होणे आवश्‍यक आहे. दुपारी १२.३० ते १.३० वा. ‘खान्देशी बोलीभाषा’ (अहिराणी, तावडी, भिल्ली, लेवा गणबोली, गुर्जर) विषयांवर परिसंवाद होतील. दुपारी १.३० ते ३.३० वा. कथाकथन होईल. दुपारी ४ ते ५.३० वा. ‘कळ्यांचे निश्‍वास’ विषयावर परिचर्चा होईल.

    सभामंडप क्र. ३ बालकवी – त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृहात ३ रोजी सकाळी ९ ते ११ व दुपारी ११.३० ते २ वा. कविकट्टा पार पडेल. दुपारी २.३० ते ४.३० वा लोककला/लोकसंगीताचा कार्यक्रम होईल. दुपारी ४.३० ते ६ वाजता ‘खान्देशी साहित्यिकांचे वैभव’ यावर परिसंवाद होईल. सायं. ६ ते ८ वाजता खान्देशी कविसंमेलन होईल.

    ४ फेब्रुवारी रोजी सभामंडप क्र.१ खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर सकाळी ९ ते १० वाजता चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर यांची प्रकट मुलाखत दीपाली केळकर (बदलापूर) घेतील. सकाळी १०.३० ते १२ वाजता अभिरूप न्यायालय होईल. यात अभिजात मराठी भाषेचा योग्य उपयोग करण्यासाठी मराठी व्यवहाराची विविध क्षेत्रे सज्ज आहेत का ? हा विषय असेल. दुपारी १२ ते १ वाजता ‘मराठी विज्ञान साहित्याची भविष्यकालीन वाटचाल’ विषयावर परिसंवाद होईल. दुपारी ३ ते ३.३० लेखिका डॉ. मीना प्रभू-पुणे, लेखक डॉ. विश्‍वास पाटील-शहादा प्रकाशक-चंद्रकांत लाखे नागपूर, अथर्व पब्लिकेशन्स, जळगाव यांचा सत्कार होईल. दुपारी ४ ते ६ वाजता खुले अधिवेशन व समारोपाचा कार्यक्रम संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाषा मंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत.

    सभामंडप क्र. २ कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात ४ रोजी सकाळी ९.३० ते ११ वाजता वर्तमान तंत्रज्ञानावर आधारित मराठी, सकाळी ११ ते २ वा साहित्यिकांचे शताब्दिस्मरण, दुपारी २ ते ३.३० वाजता ‘भारतीय तत्त्वज्ञान एक वैभवशाली संस्कृती’ विषयावर परिसंवाद होतील. सभामंडप ३ बालकवी – त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृहात दि.४ रोजी सकाळी ९ ते २ वा गझल कट्टा होईल. सायं. ७ ते ९ वाजता मुख्य सभागृहात समारोपाच्या दिवसाचा संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य ‘जाऊ देवाचिया गावा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडेल.

    संमेलनपूर्व कार्यक्रम असे

    संमेलनपूर्व कार्यक्रमात १ रोजी सकाळी १०.३० वा बालसाहित्य संमेलनाने कार्यक्रमाला सुरुवात होईल. अध्यक्षस्थानी अ.भा.मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे भुषवतील. बालमेळावा समन्वयक म्हणून एकनाथ आव्हाड जबाबदारी सांभाळतील. यावेळी बालमेळावा अध्यक्ष शुभम सतीष देशमुख, चाळीसगाव, बालमेळावा उद्घाटक पियुषा गिरीष जाधव, जळगाव व बालमेळावा स्वागताध्यक्ष दीक्षा राजरत्न सरदार, अमळनेर व्यासपीठावर उपस्थित राहतील. दुपारी १ ते २ वाजेदम्यान कथाकथन सत्र विलास सिंदगीकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. दु. २ ते ३ वाजे दरम्यान काव्यवाचन सत्र आबा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली, दुपारी ३.३० ते ४.३० वा. बालनाट्य सत्र माया धुप्पड यांच्या अध्यक्षतेखाली तर सायं. ४.३० ते ५.३० वा. नाट्यछटा सत्र प्रकाश पारखी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडेल. दुपारी ४ वाजता ‘साहित्याची वारी… रसिकांच्या दारी’ हा कार्यक्रमही पार पडणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Amalner : अमळनेर गावात विवाहितेचा विनयभंग

    January 14, 2026

    Amalner : अमळनेरमध्ये दुचाकीवर जाताना मांजाने गळा कापला

    January 14, 2026

    Amalner:दहिवद ग्रामपंचायतीच्या वृक्षलागवडीची शास्त्रज्ञांकडून पाहणी

    December 29, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.