साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव-करगाव रस्त्यावरील नवीन रेल्वे बोगदा अरुंद आहे. त्यामुळे तिसरा रेल्वे लाईनच्या कामानंतरही करगाव रस्त्यावरील रेल्वे बोगद्याची समस्या कायम आहे. या समस्येवर तोडगा न निघाल्यास राष्ट्रीय जनमंच पक्ष मनसेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी बैठक बोलावली होती. त्यात राष्ट्रीय जनमंच पक्ष, मनसेचे पदाधिकारी, वामन नगर येथील नागरिक यांचे शिष्टमंडळ आणि रेल्वे अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेण्यात आली.
रेल्वे लाईन खालून तयार केलेला बोगदा नसून एक नाल्यासारखाच प्रकार आहे. बैठकीत समाधानकारक चर्चा झाली आणि जो बोगदा आहे तो तिथून जाण्यास नागरिकांना त्रास होत आहे. त्या बोगद्यातील माती खालच्या स्तरावर आणून रिक्षा, मोटरसायकल व्यवस्थितरित्या पास होतील आणि वाहतूक सुरळीत होईल, त्याची आम्ही दक्षता घेऊ, असे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले आहे.
बैठकीला चाळीसगाव स्टेशन प्रमुख बडगुजर, एपीआय पाटील, श्री.देवरे, आरपीएफ अधिकारी सिंग, राष्ट्रीय जनमंच पक्षाचे संदीप लांडगे, मनसेचे अण्णा विसपुते, पत्रकार कुणाल कुमावत, ॲड.रवींद्र लांडगे, जालिंदर पठाडे, श्रीकांत पवार, योगेश पाटील, संजय पाटील, दीपक शेटे, राहुल बिरारी आदी उपस्थित होते.