जळगाव चांदवळ रस्त्यांचा प्रश्न सुटेना, दोन आमदार व एक खासदार यांच्या मतदार संघातून जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशाने ग्रामस्थांची नाराजी

0
21

साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी

कजगाव ता भडगाव येथून जाणारा जळगाव चांदवळ ह्या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे दिसून येतात त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता हाच प्रश्न वाहनचालकाला पडतो ठिकठिकाणी अगदी मोठमोठे खड्डे महामार्गावर पडले आहेत परिणामी अनेक ठिकाणी ह्या रस्त्यावर अपघाताचे प्रमान वाढत चालले आहे.

तर कजगावहुन चाळीसगाव जातांना अनेक ठिकाणी रस्त्यावरील खड्यांमुळे वाहने चालवणे जिकरीचे झाले आहे ह्याच रस्त्यावर कजगाव येथून जवळच असलेल्या हिंगोने ता चाळीसगाव येथील भूमिपुत्र असलेले चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांचे हिंगोने हे गाव आहे ह्या त्यांच्या गावाजवळच्या रस्त्याची झालेली दुरावस्था अत्यंत वाईट आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील बहुचर्चित मोजक्या लोकप्रतिनिधींमध्ये गणना होणारे आमदार मंगेश चव्हाणांच्या कर्मभूमी असलेल्या गावाजवळूनच जाणाऱ्या रस्त्याची झालेल्या दुरावस्थेकडे आमदार चव्हाण यांनी लक्ष देण्याची गरज आहे तर पासर्डी व भोरटेक गावाजवळ अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत ही दोन्ही गावे आमदार किशोर पाटील यांच्या मतदार संघात येतात तर हा संपूर्ण रस्ताच जळगाव पासून तर चाळीसगाव पर्यंत लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील यांच्या मतदार संघात येतो त्यामुळे दोन्ही आमदार व एक खासदार ह्या वरिष्ठ लोकप्रतिनिधीनी ठिकठिकाणी नादुरुस रस्ता दुरुस्त करण्यासाठी पर्यंत करावे अशी मागणी जोरदार होत आहे.

“””:दोन आमदार व एक खासदार तरी रस्त्याचा प्रश्न सुटेना

मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झालेल्या चांदवळ जळगाव रस्ता हा अपघाताचा पॉईंट ठरत आहे कजगाव पासून अगदी तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पासर्डी ह्या गावाजवळ अगदी मोठमोठी खड्डे पडली आहेत ह्या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी जामनेर तालुक्यातील दोन तरुणांचा अपघात झाला होता.

सुदैवाने त्यात ते बचावले होते मात्र असे अनेक अपघात ह्या ठिकाणी नेहमी होत असतात,तर कजगाव पासून एक कमी अंतरावर असलेल्या भोरटेक गावानजीकही रस्त्यावरील खड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे, भडगाव पासून तर थेट चाळीसगाव पर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यांची अक्षरक्ष चाळणी झाली आहे ह्या रस्त्याचे काम नेमके कोणत्या कारणाने अडकले आहे?जर काही अडचण असतेतर ती का सोडवण्यात आली नाही?लोकप्रिनिधीं व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष करण्याचे कारण काय? असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहे ह्या रस्त्यावर जिल्ह्यातील तिनही मोठे लोकप्रिनिधींचा मतदार संघ आहे त्यात जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील,भडगाव पाचोरा विधानसभेचे आमदार किशोर पाटील,चाळीसगाव विधानसभेचे आमदार मंगेश चव्हाण ह्या लोकप्रिनिधींचे कार्यक्षेत्र असल्याने तिन्ही लोकप्रिनिधीं लक्ष देण्याची गरज आहे याबाबत आमचे प्रतिनिधींनी संपर्क साधला खासदार उमेश पाटील आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी बातचीत केली व आमदार किशोर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

हा प्रश्न जवळपास सुटला आहे खराब झालेल्या रस्त्याचे लवकरच डांबरीकरण केले जाईल व भूसंपदानाचा प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण केली जाईल त्यामुळे लवकरच हा रस्त्याचा प्रश्न सुटणार आहे. अशी प्रतिक्रिया खासदार उमेश पाटील यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलतांना दिली.

पाठपुरावा चालू आहे, अनेकदा नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना लेखी तोंडी व फोनवरही सांगितले आहे त्यांच्याकडून फक्त एवढेच संगीतले जाते ही हा प्रस्थाव केंद्राला पाठवण्यात आला आहे. हा विषय केंद्राचा आहे अशी प्रतिक्रिया चाळीसगाव चे आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रतिनिधीशी बोलतांना दिली.

ह्या रस्त्याचा प्रश्न लवकरच सोडवण्यात यावा येथे कायम किरकोळ अपघात होत असतात त्यामुळे प्रवासी व भोरटेक ग्रामस्थांना नेहमी अडचण निर्माण होत असते तसेच भोरटेकच्या दोन्ही गावांना जोडणाऱ्या भुयार बाबत खासदारांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here