अमळनेरला अठराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचे जंगी स्वागत

0
40

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

येथील शनिवारीपासून होत असलेल्या अठराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.वासुदेव मुलाटे यांचे अमळनेरमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीच्या प्रवेशद्वारावर महिला ढोल पथकाने ढोल ताशांच्या गजरात महामानवांच्या जयघोषात अभिनव पद्धतीने जंगी स्वागत केले. अमळनेरच्या विद्रोही साहित्य संमेलन समितीने आणि महिला ढोल पथकाने केलेल्या स्वागताने सर्वच भारावून गेलेले आहे. अमळनेरचे विद्रोही मराठी साहित्य संमेलन हे ऐतिहासिक दृष्ट्या यशस्वी ठरेल, असा विश्‍वास व्यक्त केला.

आर.के.नगर, धुळे रोड येथे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीत नियोजित अध्यक्ष डॉ.वासुदेव मुलाटे यांचे आगमन होताच विद्रोही साहित्य संमेलन संयोजन समितीतर्फे अभिनव पद्धतीने महिलांच्या ढोल पथकाद्वारे स्वागत करण्यात आले.

यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्रा.प्रतिमा परदेशी, स्वागताध्यक्ष श्‍याम पाटील, मुख्य समन्वयक प्रा.अशोक पवार, मुख्य संयोजक प्रा. लिलाधर पाटील, निमंत्रक रणजित शिंदे, स्थानिक अध्यक्ष गौतम मोरे, कोषाध्यक्ष बापुराव ठाकरे, महिला समन्वयक वैशाली शेवाळे यांनी संमेलन पत्रिका आणि पुस्तक भेट देवून स्वागत केले. यावेळी मावळते अध्यक्ष तथा ज्येष्ठ गांधीवादी लेखक डॉ.चंद्रकांत वानखेडे यांचेही स्वागत करण्यात आले. यावेळी संयोजन समितीचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, संमेलनाची संपूर्ण पूर्वतयारी झाली असून संमेलनाच्या पूर्वसंध्येलाच परिसरात मोठ्या प्रमाणावर साहित्य रसिकांची गर्दी झालेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here