Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे राजकीय बळ वाढणार
    राजकीय

    माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे राजकीय बळ वाढणार

    Kishor KoliBy Kishor KoliAugust 23, 2023Updated:August 23, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई ः प्रतिनिधी

    शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाला गळती लागली आहे. अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा ठाकरे गटात परतणार आहेत.पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले यांना पराभूत केले होते.

    २०१४ च्या निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला मात्र २०१४ साली त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर वाकचौरे भाजपात गेले आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली मात्र तिथेही त्यांना अपयश आले. यानंतर आता ते पुन्हा ठाकरे गटात परतणार आहेत. उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान ‘मातोश्री’वर त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहेत.
    एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले, “आज मी स्वगृही परतत आहे. २००९ च्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मला खासदार केलं होतं. २०१४ ला जे घडलं किंवा घडवलं गेलं, त्याची मी पुन्हा चर्चा करू इच्छित नाही. परंतु एकच सांगू इच्छितो की, ‘सुबह का भुला शाम को घर आ जायें, तो उसे भुला नहीं कहते’, या उक्तीप्रमाणे मी स्वगृही परतत आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मी शिवबंधन बांधून घेत आहे.”
    लोकसभा निवडणुका सहा महिन्यावर येऊन ठेपल्या असून शिवसेना शिंदे गटासह भाजपाला शह देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Deputy Chief Minister : सुनेत्रा पवार हे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत

    January 31, 2026

    अजित पवारांच्या पार्थिवाला मुखाग्नी; सुरक्षा रक्षक रडताना जय पवारांनी केलं सांत्वन

    January 29, 2026

    महापौरपदाची लॉटरी! २९ महापालिकांच्या आरक्षण सोडतीकडे राज्याचे लक्ष

    January 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.