रावेरचे माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन यांच्या पक्षनिष्ठेची दखल घ्यावी

0
13

भाजपा कार्यकर्त्यांनी पक्ष श्रेष्ठींकडे केली मागणी

साईमत/रावेर/प्रतिनिधी

रावेरचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन हे एक सेवाभावी आणि भाजपचे निष्ठावंत कायकर्ते आहेत. तेव्हा रावेर विधानसभेची उमेदवारी त्यांना देण्याचा विचार भाजप पक्षश्रेष्ठींनी करावा, अशी मागणीवजा अपेक्षा रावेर तालुक्यातील महाजन समर्थक कार्यकर्त्यांनी केली आहे.

श्री. महाजन यांच्यावर रा.स्व.संघाचे संस्कार असून त्यांनी भाजपचे संघटन वाढविण्यासाठी खूप परिश्रम घेतले आहे. राजकीय क्षेत्रात सक्रीय होण्यापूर्वी ते तब्बल दहा वर्षे माळी समाजाचे अध्यक्ष होते. त्यांच्या कारकीर्दीत सर्वाधिक ७६ सामूहिक विवाह लावण्यात आले. सामाजिक कार्याबरोबरच त्यांनी भाजप पक्ष संघटन मजबूत केले. परिणामी ते नगरसेवक पदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून आले होते. त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांना रावेरचे उपनगराध्यक्ष आणि नंतर नगराध्यक्ष पद मिळाले होते.

उमेदवारी दिल्यास पक्षाला होईल उपयोग

रावेरचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. ‘गुड मॉनिंग’ ग्रुपच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांच्या ते उपयोगी पडतात. मुळात सेवाभावी वृत्ती असल्याने त्यांची जनमानसात चांगली प्रतिमा आहे. त्यामुळे अशा सेवाभावी प्रामाणिक कार्यकर्त्यांस विधानसभेची उमेदवारी दिल्यास पक्षाला त्याचा उपयोग होईल, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here