भुसावळहून निघालेली पालखी शेगावला दाखल

0
4

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी

येथील जामनेर रस्त्यावरील श्री गजानन महाराज देवस्थानची पालखी ‘गण गण गणात बोते’च्या गजरात मंगळवारी, १६ जानेवारी रोजी श्री क्षेत्र शेगाव येथे दाखल झाली. पालखी सोबत असलेल्या वारकऱ्यांचा क्षीण क्षणार्धात दूर झाल्याचे दिसून येत होते. तसेच महाराजांच्या जपामुळे भाविक मंत्रमुग्ध झाले होते.

प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही देवस्थानची पालखी १२ रोजी सकाळी भुसावळहून शेगावकडे उत्साहात मार्गस्थ झाली होती. सायंकाळी मुक्ताईनगर येथे मुक्काम करत १३ ला मलकापूर, १४ ला नांदुरा तर १५ रोजी अन्नकुटी येथे मुक्कामी होती. दरम्यान, भाविकांनी ठिकठिकाणी रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढत, पुष्पवर्षाव आणि पणत्या लावून पालखीचे स्वागत केले. तसेच भोजन, चहा, नाश्‍त्याची सोय केली होती. १६ रोजी सकाळी ७ वाजता अन्नकुटीहून ही पालखी ‘गण गण गणात बोते’ च्या गजरात निघाली. सकाळी ११ वाजता श्री क्षेत्र शेगाव गजानन महाराज समाधी मंदिराजवळ पोहोचल्यावर भाविक मंत्रमुग्ध झाले होते. महाराष्ट्रातील इतर प्रांतांतूनही शेगावात पालख्या दाखल झाल्याने सर्व भक्त श्री गजाननमय झाल्याचे येथे पहावयास मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here