शांतता समितीच्या बैठकीतील चर्चेतून उमटला सूर
साईमत/यावल/प्रतिनिधी
शहरासह तालुक्यात काही कार्यालयातील अधिकाऱ्यांना काही ठराविक पदाधिकारी आपल्या राजकीय आजी-माजी पदाचा, कार्याचा प्रभाव आणि दबाव टाकून अधिकाऱ्यांना हेतुपुरस्कर त्रास देत आहेत. त्यामुळे अधिकारी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याकडे खासदार, आमदार आणि राजकीय पक्षाच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी आपले लक्ष केंद्रित करून आपल्या ‘त्या’ ठराविक पदाधिकाऱ्यांना समज देण्याची वेळ आली असल्याचे संपूर्ण अधिकारी, कर्मचारी, नागरिकांमध्ये चर्चिले जात आहे.
यावल शहरातील शांतता कमिटीत ९५ टक्के सदस्य चांगल्या वर्तुणुकीचे, चारित्र्यशील संपन्न तथा शहरात जातीय सलोखा अबाधित राहण्याकामी सक्रिय कामकाज करणारे आहेत. परंतु काही चार-पाच सदस्यांचे उद्योगधंदे आणि वागणूक चारित्र्य लक्षात घेता ते स्वतः कायदा व सुव्यवस्थेचा भंग करणारे तथा उपादीखोर असल्याची संपूर्ण यावल शहरात चर्चा सुरू झाली आहे. याबाबत शांतता कमिटी सदस्यांमध्ये ज्यांची चांगली वर्तणूक आणि चारित्र्यशील आहेत आणि नेहमी शांतता कमिटी मीटिंगमध्ये उपस्थित राहतात. त्यांना शांतता समितीत घेतले जाणार असल्याचे चर्चिले जात आहे.
काही ठराविक ३ ते ४ पदाधिकारी हे आपल्या खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष यांच्या राजकीय, प्रभावाचा आणि पदाचा दुरुपयोग करीत वैयक्तिक स्वार्थापोटी अधिकाऱ्यांकडे खोट्या लेखी तक्रारी, माहितीचा अधिकार स्वतः किंवा दुसऱ्यामार्फत अर्ज टाकून अधिकाऱ्यांवर दबाव टाकून चुकीचे कामे करण्यासाठी आग्रह धरत असल्याने काही अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
ज्या काही ठराविक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी खोट्या लेखी तक्रारी किंवा त्रास देण्याच्या उद्देशाने माहितीचे अर्ज टाकले आहे, त्यांची चौकशी त्यांच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी केल्यास आपले ते पदाधिकारी, कार्यकर्ते जनहिताची कामे सोडून वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी यावल शहरात काय-काय उद्योग करीत आहे, त्याची अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून पक्षांतर्गत कारवाई करायला पाहिजे, असे आता यावल तालुक्यातील जनतेत चर्चिले जात आहे.
यावल शहरात अफू, गांजा, बनावट हातभट्टीची, देशी दारू,पन्नीची दारू आणि इतर महसूल, पोलीस तसेच उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित अवैध कामे करणारे कोण आहेत…? त्याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यांची लवकरच शांतता कमिटीमधून हकालपट्टी केली जाणार आहे.
कारवाईही होणार असल्याची निश्चित झाले आहे.
वर्तमानपत्रात चुकीची कामे करणाऱ्यांची बातमी आल्यास संबंधित प्रतिनिधीला मारहाण करण्याची आणि त्याविरुद्ध खोटी तक्रार करून व्हाॅट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून बदनामी करून त्याला अपंग करू, असे म्हणत शहरात अवैध धंदे आणि चुकीची कामे करणाऱ्यांमध्ये चिथावणी देऊन त्यांना दारू पाजून मारहाण करण्याचे उद्योग सुरू झाल्याने शहरातील वातावरण गढूळ करण्याचे काम होत असल्याने, बदनामी कशी केली जाते…? त्याचे व्हाॅट्सॲपवरून आणि कार्यालयात खोट्या तक्रारी केल्याची पुरावे संकलन करण्याचे काम सुरू आहे. लवकरच कारवाई होणार असल्याचेही यावल शहरात चर्चिले जात आहे.
शेतातून शेती साहित्य जातेय चोरीस
यावल पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून शेती साहित्य चोरीस जात आहेत. बाहेरगावात आणि यावल शहरात चोरीस जाणारे मोबाईल यावल शहरात कोणाच्या आशीर्वादाने आणि कोणाच्या प्रभावाखाली कोण विकत घेत आहे…? त्याचीही चौकशी सुरू झाली आहे, तसेच पोलीस स्टेशन हद्दीत चमकोगिरी करणाऱ्यांची पात्रता आणि पात्रता नसताना त्यांना मदत करणाऱ्यांचे पितळही लवकरच कायदेशिररित्या उघडे पडणार, असेही यावल शहरात चर्चिले जात आहे.