नेतृत्वगुणासह संघभावना वाढीसाठी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५–२०२६ साठी शालेयस्तरीय मंत्री मंडळाची निवडणूक व शपथविधी सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव आणि संघभावना वाढावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. निवडणूक प्रक्रियेचे नेतृत्व प्रा. योगेश धनगर, प्रा. प्रमोद भोई यांनी केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आणि नवनिर्वाचित उमेदवारांची नावे प्रभारी प्रा. अर्जुन शास्त्री यांनी जाहीर केली. शपथविधी सोहळा प्राचार्य डॉ. स. ना. भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. नवनिर्वाचित सर्व विद्यार्थ्यांना उपप्राचार्य प्रा. आर. बी. ठाकरे यांनी शपथ दिली. यावेळी पर्यवेक्षक स्वाती बऱ्हाटे, समन्वयक प्रा. उमेश पाटील यांच्यासह संपूर्ण शिक्षक उपस्थित होते.
नवनिर्वाचित शालेय मंत्री मंडळात मुख्यमंत्रीपदी पूर्वा हेमराज भारंबे, उपमुख्यमंत्री अखिलेश रामकृष्ण मोतीराळे, सांस्कृतिक मंत्री अंकित मिलिंद पाटील, क्रीडा मंत्री हरीष कमलाकर शिंपी, स्वच्छता मंत्री तनुश्री प्रकाश सूर्यवंशी, शिस्तपालन मंत्री छायेश संदीप भोळे, ग्रंथालय मंत्री नंदिनी सुधाकर मेटे, पर्यावरण मंत्री स्पंदन देविदास शिंपी, आरोग्य मंत्री रोहिणी संजीव झोपे, अन्न व पाणीपुरवठा मंत्री तुषार निलेश पाटील, सामाजिक कार्य मंत्री सुमित अनिल कावडकर, वित्त मंत्री गौरव दुर्गादास कांबळे, शिक्षण मंत्री तृषांत सुभाष महाजन, संरक्षण मंत्री अक्षरा प्रवीण महाजन यांचा समावेश आहे.
मंत्री मंडळ वर्षभर विविध उपक्रम राबविणार
मंत्री मंडळाचे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक मार्गदर्शक समितीत प्रा. शोभना कावळे, प्रा. महेंद्र राठोड, प्रा. दिनेश महाजन, प्रा. पूजा सायखेडे व प्रा. सूर्यकांत बोइनवाड यांचा समावेश आहे. समितीच्या मार्गदर्शनाखाली मंत्री मंडळ वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि क्रीडाविषयक उपक्रम राबविणार आहे. नवनिर्वाचित मंत्री मंडळाचे अभिनंदन करुन नेतृत्व जबाबदारीचे प्रतीक आहे. विद्यार्थी मंत्री मंडळाने शिस्त, कर्तव्यभावना आणि सेवाभाव जपत महाविद्यालयाचा लौकिक वृद्धिंगत करावा, असे उपप्राचार्य प्रा. आर. बी. ठाकरे यांनी सांगितले. सूत्रसंचालन डॉ. अतुल इंगळे तर आभार प्रा. सूर्यकांत बोइनवाड यांनी मानले.