Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Institutions like ‘IIT’ : ‘आयआयटी’सारख्या उच्च दर्जाच्या संस्था उभारण्याची गरज
    जळगाव

    Institutions like ‘IIT’ : ‘आयआयटी’सारख्या उच्च दर्जाच्या संस्था उभारण्याची गरज

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 16, 2025No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अभियंता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी कुलगुरू डॉ. के.बी. पाटील यांचे प्रतिपादन

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

    समाजाच्या प्रगती आणि युवा पिढीच्या क्षमतेसाठी शिक्षणासह ‘आयआयटी’सारख्या उच्च दर्जाच्या तांत्रिक आणि संशोधनावर आधारित संस्थांची उभारणी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जळगाव विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील यांनी केले. ते जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात अभियंता दिनानिमित्त जळगाव जिल्हा शासकीय अभियंता सहकारी पतपेढीतर्फे आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात बोलत होते.

    याप्रसंगी समारंभाचे अध्यक्ष तथा विशेष सत्कारार्थी माजी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील, प्रमुख वक्ते सत्कारार्थी महेश झगडे यांचा मानपत्र, शाल, डॉ.विश्वेश्वरय्यांची प्रतिमा, पुस्तक, चांदीचे पदक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ‘उत्कृष्ट अभियंता’ गौरव पुरस्काराने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता इंजि. राहुल देविदास पाटील, पाटबंधारे प्रकल्प मंडळ जळगावचे अधीक्षक अभियंता इंजि.यशवंतराव काशिनाथ भदाणे यांनाही सन्मानित करण्यात आले.

    यासोबतच भुसावळ येथील सामाजिक संस्था ‘प्रणिता प्रतिष्ठान’ यांना ११ हजार रुपयाचा धनादेश, ‘सुटलेली गणितं’ पुस्तक, ‘बॉक्सिंग’ क्रीडा प्रकारात सुवर्ण पदके मिळविणारी यावल तालुक्यातील किनगाव येथील दिशा विजय पाटील हिचा आई-वडिलांसह शाल, साडी, चांदीचे पदक आणि ११ हजार रुपयांचा धनादेश, पुस्तक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सभासद पात्र विद्यार्थ्यांना चांदीचे पदक, प्रशस्तीपत्र व पुस्तक तर सेवानिवृत्त सभासदांचाही सपत्नीक शाल, साडी, पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

    याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी माहिती आयुक्त व्ही.डी.पाटील, जळगाव तापी पा.वि.म.चे कार्यकारी संचालक जयंत बोरकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, ज.पा.प्र.मंडळाचे अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता तथा प्रशासक संतोष भोसले, शासकीय तंत्रनिकेतनचे सेवानिवृत्त प्राचार्य महेंद्र इंगळे, अभियंता पतपेढीचे मुख्य प्रवर्तक तथा आजीव अध्यक्ष साहेबराव पाटील, म्हसावद येथील इंग्लिश मीडियम स्कुलच्या अध्यक्षा तथा संस्थापिका प्रा.विमल वाणी, सा.बा.वि. क्र.२ चे कार्यकारी अभियंता स्वाती सुराणा, तापी गोदावरी जलविद्युत तथा उपसा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता धनंजय दाहेदार, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे सर्व कार्यकारी अभियंता, तांत्रिक सल्लागार पी.आर.पाटील, पतपेढीचे चेअरमन प्रमोद पाटील, व्हा.चेअरमन चंद्रशेखर तायडे यांच्यासह सर्व संचालक आदी मान्यवर तसेच कार्यक्रमाला दीपस्तंभ मनोबलचे विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    समाजाच्या विकासासाठी अभियंत्यांनी पुढे यावे

    कार्यक्रमात महेश झगडे यांनी ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि प्रशासकीय सेवेतील अनुभव’ विषयावर मार्गदर्शन केले. तसेच पुष्पगुच्छ भेट देण्याऐवजी कुलगुरु के.बी.पाटील यांचे ‘सुटलेली गणितं’ आणि महेंद्र इंगळे यांचे ‘अभियांत्रिकी स्पंदने’ ही पुस्तके भेट देण्यात आली. सुरुवातीला स्वागत गीत प्राची पाटील तर प्रा.विमल वाणी यांनी ‘आधुनिक भारुड’ सादर केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करुन अभियंता डॉ.विश्वेश्वरय्या यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अभियंत्यांनी पुढे यावे, असे आवाहन केले.

    यांनी घेतले परिश्रम

    यशस्वीतेसाठी जिल्हा शासकीय अभियंता सहकारी पतपेढीचे संचालक कामेश पाटील, आरती सूर्यवंशी, स्वाती नन्नवरे, सचिन पाटील, हेमंत पवार, सुभाष चव्हाण, ब्रह्मानंद तायडे, तुषार राजपूत, कुलदीप पाटील यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्राची पाटील, हर्षल पाटील प्रास्ताविक तथा आभार साहेबराव पाटील यांनी मानले. समारंभाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    February 26, 2026

    Jalgaon:जळगाव शहरात भरदिवसा ८ लाखांची रोकड लंपास; दुचाकी डिक्की फोडून चोरटा फरार

    February 26, 2026

    Chopra:१० हजारांच्या कर्जासाठी २ लाख व्याज भरूनही तरुणाची आत्महत्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.