Muslim Community : मुस्लिम समाजाने मुख्य प्रवाहात सामील व्हावे : जमाल सिद्दीकी

0
3

भाजप अल्पसंख्यांक मोर्चा राष्ट्रीय अध्यक्षांचा दौरा, कार्यकर्त्यांशी संवाद आणि समाजासाठी आवाहन

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

केंद्र व राज्य सरकारने अल्पसंख्यांकांसाठी अनेक योजनांद्वारे मदतीचा हात दिला आहे. ह्या समाजाचा खरा विकास भाजपाच्या माध्यमातूनच शक्य आहे. मुस्लिम समाजाने अनेक वर्षे पारंपरिक पद्धतीने काँग्रेसला साथ दिली आहे. परंतु त्यातून समाजाला काहीही साध्य झालेले नाही. काँग्रेससारख्या पक्षांनी फक्त वोट बँक म्हणून मुस्लिम समाजाचा वापर केला आहे. आता मुस्लिम समाजाने अशा संधी साधू पक्षाची साथ सोडून मुख्य प्रवाहात भाजपासोबत सामील होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी केले. उत्तर महाराष्ट्र दौऱ्याप्रसंगी त्यांनी नुकतीच जळगाव जिल्हा भाजपा कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी कार्यकर्त्यांसह पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी त्यांच्या सोबत महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे संचालक सलीम बागवान, सुफी संवाद राष्ट्रीय प्रभारी डॉ. अस्लम खान, महाराष्ट्र प्रभारी आबेद अली चौधरी उपस्थित होते. जळगाव येथील स्वागत सोहळ्यात भाजपा पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. शहेबाज शेख, प्रदेश कार्यकारिणी सदस्य जहांगिर खान, शब्बीरअली सय्यद यांच्या हस्ते जमाल सिद्दीकी यांचा सत्कार करण्यात आला.

मुस्लिमांनी स्वार्थ साधणाऱ्या पक्षांची पूर्णपणे साथ सोडावी

काँग्रेस व इतर काही पक्ष धर्मनिरपेक्षतेचा आडवा वापर करून मुस्लिम समाजात भीती निर्माण करून स्वतःचा स्वार्थ साधत आहेत. त्यामुळे मुस्लिमांनी अशा पक्षांची साथ पूर्णपणे सोडावी, असेही सिद्दीकी यांनी स्पष्ट केले. जळगाव जिल्ह्यातील दौऱ्याद्वारे भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीकोनातून सक्रिय प्रयत्न करत असल्याचे दिसून आले.

यांची होती उपस्थिती

यावेळी धीरज वर्मा, प्रकाश पंडित, आसिफ शेख, अ.राउफ शेख, रज्जाक खान, याकूब खान, अफसर शेख, जमील शेख, ईद्रीस शेख, वसीम शेख, अनीस शेख, अकबर काकर, वसीम पटेल, रहीम शेख, नासिर शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते, स्थानिक समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here