साईमत, कासोदा, ता.एरंडोल : वार्ताहर
येथे हजरत सादिक शाह सरकारच्या उर्सनिमित्त मुशायरीच्या कार्यक्रम पार नुकताच पडला. मुशायरा कार्यक्रमात शेर शायरी, गझल शायरानी सादर केले. त्याला प्रेक्षकांकडून दाद मिळाली. मुशायऱ्याची मैफिल उत्साहाच्या वातावरणात पार पडली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चाळीसगाव येथील आ.मंगेश चव्हाण, पाचोरा येथील आ.किशोर पाटील उपस्थित होते. संयोजकांनी त्यांचा सत्कार केला.
कार्यक्रमात हामीद (भुसावळ), अल्ताफ जिया (मालेगाव), जुबेर अली ताबिश (नगरदेवळा), सुंदर मालेगावी (मालेगाव), चिराग हुनर (सुरत), तालीब सुरती (सुरत), इरशाद अंजुम (मालेगाव), साबीर आफाक (कासोदा), अहमद रजा (कासोदा), आता ए सर (कासोदा), रफिक आलम (कासोदा) यांच्यासह आदींनी शायरानी सहभाग नोंदविला होता.